दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणे पुरावा सादर करणार; पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले

मुंबई पोलिसांकडून नितेश राणेंना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणे पुरावा सादर करणार; पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले

nitesh rane meets pratik pawar in karjat, dist- ahamadnagar

बॉलीवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. राज्यात ठाकरे सरकारच्या काळात दिशा सालियन हिचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात भाजपाचे आमदार नितेश राणे यांची चौकशी होणार आहे. दिशा सालियन हिची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला होता.

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी केली होती. शिवाय दिशा सालियन हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला होता. शिवाय या हत्येप्रकरणातील पुरावे असल्याचा दावाही आमदार नितेश राणे यांनी केला होता. यानंतर या तपासाला वेग आला असून आता या प्रकरणी चौकशी होणार आहे. मुंबई पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. या चौकशीत आता नितेश राणे नेमका काय जबाब देतात आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात कोणते पुरावे सादर करणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दिशा सालियान ही अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर होती. ८ जून २०२० रोजी मुंबईतील घराच्या बाल्कनीमधून खाली पडून दिशा सालियान हिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी दिशाने आपल्या लंडनमधील एका मैत्रिणीला फोन केला होता. आपल्या मैत्रिणीशी बोलताना दिशा थोडी चिंतेत वाटत होती. कामाचा लोड जास्त असल्याचे तिने आपल्या मैत्रिणीला सांगितले होते. त्यानंतर थोड्याचवेळात तिचा होणारा नवरा रोहन याने दिशा ज्या खोलीत राहात होती त्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिशा त्या खोलीमध्ये नव्हती. त्याने खिडकीतून खाली पाहिले असता दिशा पडलेली दिसली. या प्रकरणाचा तपास सीबीआय देखील करत आहे.

हे ही वाचा:

अनेक महिने बर्फात दबलेले तीन जवानांचे मृतदेह लष्कराला सापडले !

शासकीय नोकरी मिळताच पत्नीने पतीला दिला डच्चू !

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरबद्दल पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल

‘रामसेतू’ मार्गाचे रहस्य उलगडणार, इस्रोने तयार केला समुद्राखालील नकाशा !

अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आले. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्याने छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला असे सीबीआय तपासात समोर आले आहे. दरम्यान दिशा सालियान प्रकरणात राजकीय वर्तुळातूनही अनेक आरोप करण्यात आले आहेत. तिची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे.

Exit mobile version