26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषमुंबईत वोट जिहाद? मविआच्या उमेदवारांना एकगठ्ठा मते देण्याचे फतवे

मुंबईत वोट जिहाद? मविआच्या उमेदवारांना एकगठ्ठा मते देण्याचे फतवे

नितेश राणे यांनी एक्सवर केला व्हीडिओ शेअर

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी मुस्लिम मतांचे राजकारण महाविकास आघाडीकडून खेळले जात असल्याचा आरोप होत आहे. भाजपा नेते व आमदार नितेश राणे यांनी असाच एक व्हीडिओ एक्सवर शेअर करत उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला एकगठ्ठा मते देण्याचा निर्णय मुस्लिम संघटनांनी घेतल्याचे निदर्शनास आणले आहे.

यात नितेश राणे हा व्हीडिओ शेअर करत आवाहन करतात की, हे आहे उद्धव ठाकरेंचे नकली हिंदुत्व. मतदारांनी नक्की ऐका…विचार करून मतदान करा!

हे ही वाचा:

मुंबईकरांनो रेकॉर्डब्रेक मतदान करा…देशात सगळे जुने विक्रम तुटणार आहेत

मविआबद्दल राज ठाकरे म्हणाले, जे सत्तेत येणारच नाहीत त्यांच्याबद्दल का बोलावे?

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना भेटण्यासाठी पैसे मागितले!

अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना लष्करी गणवेश, वाद वाढताच महापालिकेचा यू-टर्न!

या व्हिडिओत एक मुस्लिम मौलवी सांगत आहे की, देशातील अवस्था पाहता आपल्याला इशान्य मुंबईतील संजय दिना पाटील यांना मतदान करायचे आहे. भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचे आहे.

मागे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांच्या भाचीने असेच वोट जिहादचे आवाहन केले होते. त्यानंतर भाजपाकडून नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी त्यावर कठोर टीका केली होती. पुण्यातही कुल जमातने असेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन मुस्लिम समाजातील लोकांना एकत्र करून केले होते. भाजपाला खाली खेचण्यासाठी सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर, अमोल कोल्हे यांनाच मतदान करा असे आवाहन यावेळी करण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा