केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची मुलगी परकला वांगमयी हिचा विवाह गुजराते प्रतीक दोषी यांच्याशी बेंगळुरूमधील एका हॉटेलमध्ये अत्यंत साधेपणाने झाला. बुधवारी झालेल्या या सोहळ्यात केवळ कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. विवाहसोहळ्यात कोणीही राजकीय व्यक्ती अथवा व्हीआयपी व्यक्ती सहभागी नव्हती.
परकलाचा विवाह प्रतीक याच्याशी हिंदू धर्मातील ब्राह्मण परंपरेनुसार, उडुपी अदामारू मठाच्या संतांच्या आशिर्वादात पार पडला. नववधूने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तर, वराने शुभ्र रंगाचा पंचा आणि उपरणे पांघरले होते. निर्मला सीतारामन यांनी या खास दिवशी मोलाकलमरू साडी नेसली होती. विवाह आदमरू मठाच्या वैदिक मंत्रोच्चारणात पार पडला.
🎊 Union Finance Minister Nirmala Sitharaman's daughter got married in Bangalore yesterday. 🎉🎉 The news was not on TV or on print media. An example of simple living and working with nation first principles. 🙏🙏🙏 pic.twitter.com/r818unikZP
— Deepak Kumar. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪 (@DipakKumar1970) June 8, 2023
परकला वांगमयी हिने राष्ट्रीय वृत्तपत्रात काम केले आहे. तिने दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी विषयातून एमए केले आहे. तिने नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या मेडिल स्कूल ऑफ जर्नलिझममधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तर, प्रतीक दोषी पंतप्रधान कार्यालयात ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) पदावर कार्यरत आहेत. ते सन २०१४पासून पंतप्रधान कार्यालयात काम करत आहेत. त्यांना सन २०१९मध्ये जॉइंट सेक्रेटरीचे पद देऊन ओएसडी बनवले गेले. ते संशोधन आणि व्यूहरचना याबाबतचे काम पाहतात. प्रतीक यांनी सिंगापूरच्या मॅनेजमेंट स्कूलमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. जेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा प्रतीक हे त्यांच्या कार्यालयात रिसर्च असिस्टंट होते.
हे ही वाचा:
लोकसभा निवडणुकीआधी एनडीएचे बळ वाढणार
मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये का शिजवले? आरोपी मनोजने सांगितले कारण
अमेरिकेतील सभांमध्ये राहुल गांधींच्याभोवती जिहादीं गटांचे कोंडाळे
पालखी सोहळ्यातल्या वारकऱ्यांना कागदी घोड्यांचा फटका
निर्मला सितारामन यांचे पती राजनैतिक अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी कम्युनिकेशन कन्स्टल्टंट म्हणूनही काम केले आहे. ते जुलै २०१४ आणि जून २०१८ दरम्यान आंध्र प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेटपदावरही राहिले आहेत.