महिला आरक्षण विधेयकाचे श्रेय नरसिंह राव यांना !

निर्मला सीतारामन यांचे वक्तव्य

महिला आरक्षण विधेयकाचे श्रेय नरसिंह राव यांना !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहांत संमत झाल्याचे श्रेय माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना दिले आहे. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात पंचायत राजमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण आणले होते. त्याबद्दल अर्थमंत्र्यांनी नरसिंह राव यांचे कौतुक केले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे पंचायत राजमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण आणल्याबद्दल कौतुक केले. त्यावेळी पंचायत राजमध्ये ३३ टक्के आरक्षण आणल्यामुळे आता अनेक राज्यांनी पंचायत स्तरावरील महिलांचे आरक्षण ३३ टक्क्यांवरून ५० टक्के केले आहे. पंचायत स्तरावर महिलांचे अधिकाधिक योगदान दिसून येत आहे, अशा शब्दांत निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत नरसिंह राव यांचे कौतुक केले.

हे ही वाचा:

शरद पवार, राहुल गांधींना मुस्लिम मतं हवीत; पण आम्ही नको!

छोटा राजनचा नवा अवतार, लॉरेंस बिश्नोई…

शरद पवार, राहुल गांधींना मुस्लिम मतं हवीत; पण आम्ही नको!

ओंकारेश्वरला उभी राहिली आदि शंकराचार्यांची भव्य मूर्ती !

पी.व्ही. नरसिंह राव हे जून १९९१ ते मे १९९६ पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. सुरुवातीला तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मे १९८९मध्ये पंचायत आणि नगर पालिकांमध्ये महिलांच्या एक तृतीयांश आरक्षणासाठी घटना दुरुस्ती विधेयके मांडली होती. ही विधेयके लोकसभेत यशस्वीरित्या मंजूर झाली. मात्र सप्टेंबर १९८९मध्ये राज्यसभेत त्याला मंजुरी मिळू शकली नाही. त्यानंतर, पंतप्रधान झाल्यानंतर नरसिंह राव यांनी पंचायत आणि नगर पालिकांमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश आरक्षण सुरक्षित करण्याच्या उद्देशाने एप्रिल १९९३ मध्ये ही घटनादुरुस्ती विधेयके पुन्हा सादर केली. या वेळी, दोन्ही विधेयके कायदा बनून विधिमंडळ प्रक्रियेत यशस्वीपणे राबवण्यात आली.

Exit mobile version