विश्वंभर चौधरींनी पळ काढला

परिवारासाठी वेळ देणार असल्यामुळे माघार

विश्वंभर चौधरींनी पळ काढला

‘निर्भय बनो’च्या माध्यमातून सभा घेत लोकशाही वाचविण्याचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा, केंद्र सरकार, महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार यांच्यावर टीका करणारे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी १८ मेपर्यंत सभा घेतल्यानंतर या सगळ्यातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

विश्वंभर चौधरी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.

विश्वंभर चौधरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, १८ मे रोजी निर्भय बनोची शेवटची सभा मुंबईत होईल. त्यानंतर सार्वजनिक आयुष्यातून संपूर्ण निवृत्ती घेण्याचा मी विचार करत आहे. तब्येत, व्यवसाय, परिवार यांना पूर्ण वेळ देण्याचा विचार आहे.

या पोस्टनंतर चौधरी यांनी अचानक निर्भय बनोमधून पळ का काढला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. १८ मे रोजी महाराष्ट्रातील प्रचाराचा धुरळाही खाली बसणार आहे. त्यानंतर कोणत्याही प्रचार सभा निदान महाराष्ट्रात नसतील त्यामुळे ही निवृत्ती घेतली असली तरी संपूर्ण सार्वजनिक आयुष्यातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे ते पळ काढत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

हे ही वाचा:

छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवचरित्र विषयांवरील भव्य उपक्रम

सलीम मलिकची विशेष रजा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

“काँग्रेस आपल्याच देशाला घाबरवण्याचा प्रयत्न करतेय”

पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मॅनेजरचे निलंबन; मतदानाच्या आदल्या रात्री खुली होती बँक

निर्भय बनोच्या माध्यमातून विश्वंभर चौधरी, ऍड. असीम सरोदे यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा यांच्यावर टीका करण्याची मालिका सभांच्या माध्यमातून सुरू ठेवली होती. लोकशाही वाचविण्याच्या नावाने या सभा होत होत्या. पण नंतर हळूहळू त्यात राजकीय पक्षांचे नेतेही सहभागी होऊ लागले. आता तर स्वतः चौधरी आणि सरोदे हेदेखील उद्धव ठाकरे यांच्या सभांमध्ये सहभागी झाले. त्यामुळे ही चळवळ केवळ लोकशाही वाचविणारी नव्हती तर ती महाविकास आघाडी वाचविण्यासाठी होती, अशी टीका होऊ लागली.

मागे काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांची नावे टाकण्यात आली होती पण नंतर ती याच दोघांच्या विनंतीवरून मागे घेण्यात आल्याचे म्हटले गेले. आपल्यावर महाविकास आघाडीचे प्रचारक असे लेबल लावण्यात येत असल्यामुळे आपण स्टार प्रचारक झालो तर हरकत नाही अशी त्यांची भूमिका होती. मात्र निर्भय बनोच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा गट यांना अनुकूल अशी मते व्यक्त केली. किंबहुना, या महाविकास आघाडीला समर्थन देण्यासाठी उघड बाजू घेतली.

Exit mobile version