पाच वर्षे लंडनच्या तुरुंगात कैद असलेल्या हिरेव्यापारी नीरव मोदी याने मंगळवारी जामिनासाठी एक नवीन याचिका दाखल केली. मात्र ब्रिटनच्या एका न्यायालयाने ती फेटाळली. नीरव मोदी याची याचिका पाचव्यांदा फेटाळण्यात आली आहे. न्याय मिळवण्यासाठी त्याची सुटका करणे, धोक्याच ठरेल, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. भारतातील प्रत्यार्पणाच्या खटल्यात पराभूत झालेल्या नीरव मोदी याच्यावर फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत.
न्यायालयासमोर मोदीची अनुपस्थिती
५२ वर्षीय नीरव मोदी लंडनमध्ये जामिनाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयासमोर हजर राहू शकला नाही. त्याचा मुलगा आणि दोन मुली गॅलरीत उपस्थित होत्या. गेल्या वेळचा जामीन अर्ज तब्बल साडेतीन वर्षांपूर्वी दाखल केला होता, हा नीरव मोदी यांच्या कायदेशीर टीमचा युक्तिवाद जिल्हा न्यायाधीश जॉन जानी यांनी मान्य केला.
हे ही वाचा:
खलिस्तान समर्थक परेडमध्ये ‘हिंसेचा उत्सव’;भारताने कॅनडाला सुनावले!
बंगाल शिक्षक भरती रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती!
‘आसाममध्ये सर्वाधिक तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान’
पॅलेस्टाईन समर्थक निदर्शकांनी अमेरिकेचा ध्वज जाळला!
न्यायालयाने याचिका फेटाळली
‘जामीन दिल्यास नीरव मोदी न्यायालयापुढे हजर राहणार नाही किंवा साक्षीदारांत हस्तक्षेप करण्याचा धोका आहे,’ असे न्यायालयाने नमूद केले. ‘या खटल्यात एका मोठ्या फसवणुकीचा आरोप आहे. अशा परिस्थितीत जामीन दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे हे निवेदन स्वीकारले जाऊ शकत नाही,’ असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. सुनावणीच्या वेळी भारतातून सीबीआय आणि ईडीचे संयुक्त पथकही उपस्थित होते.
नीरव मोदीचे वाईट दिवस सन २०१९पासून सुरू झाले. पंजाब नॅशनल बँकेने त्याच्यावर व त्याचा मामा मेहुल चोकसीवर बँक कर्मचाऱ्यांच्या मदतीने १३ हजार ५०० कोटींच्या फसवणुकीचा आरोप केला आहे.