आपल्या खोट्या लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले पत्रकार निरंजन टकले हे सध्या समाज माध्यमांवर भरपूर ट्रोल होत आहेत. याला कारण ठरले आहे टकले यांची सोशल मीडिया पोस्ट. टकले यांनी उद्विग्नतेतून ही पोस्ट लिहिली आहे.
निरंजन टकले यांनी ‘हू किल्ड जज लोया’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. पण या पुस्तकाला जनतेचा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. वाचकांनी या पुस्तकाला नाकारले आहे. यावरूनच टकले हे पुरते निराश झाले आहेत. त्यांना अशा प्रकारच्या प्रतिसादाचीच अपेक्षाच नव्हती. त्यामुळे आपल्या पुस्तकाला लोक विचारात नाहीत हे सत्य पचवणे त्यांना जड जात आहे.
हे ही वाचा:
लक्षद्वीपजवळ २१९ किलो हेरॉईन केले जप्त
राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेकडून अल्टिमेटम
नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध
शिवलिंगाबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर प्राध्यापकाला अटक
याच निराशेतून निरंजन टकले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. फेसबुकवर माझे पाच हजार मित्र आहेत. तर ट्विटरवर एकोणीस हजार फॉलोअर्स आहेत. पण असे असून देखील माझे पुस्तक ५ टक्के लोकांनीही विकत घेतले नाही. आपण असे फॅसिस्ट शक्तींशी लढणार आहोत का? अशाप्रकारे आपण या शक्तींशी लढणाऱ्यांचे बळ वाढवणार आहोत का? असे टकले यांनी विचारले आहे.
Do I really have 19000 followers on Twitter and 5000 friends on Facebook? Not even 5% have purchased the book …. Defeated again… is this how we are going to fight the fascist? Is this how we support the fighters??
— Niranjan Takle (@niranjan_takle) May 20, 2022
टकले यांच्या या पोस्ट नंतर नेटकऱ्यांनी त्यांची भरपूर खिल्ली उडवली आहे. निरंजन टकले यांचा खोट्या लिखाणाचा इतिहास प्रसिद्ध आहे. टकले यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणाऱ्या लिखाणामुळे द वीक या साप्ताहिकाला माफीनामाही द्यावा लागला होता.