डायमंड लीग भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राचा पहिला क्रमांक हुकला!

नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात ८३.८० मीटर अंतरावर भाला फेकला.

डायमंड लीग भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राचा पहिला क्रमांक हुकला!

भारताच्या नीरज चोप्राला प्रतिष्ठित डायमंड लीगच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. शनिवारी रात्री उशिरा अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये झालेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात ८३.८० मीटर अंतरावर भाला फेकला. ही त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. मात्र तो चेक गणराज्यच्या जाकुब वादलेच याला मागे टाकू शकला नाही. वादलेच याने ८४.२४ मीटर अंतरावर भाला फेकून स्पर्धेत पहिले स्थान पटकावले. तर, फिनलँडच्या ऑलिव्हर हॅलेंडर याने ८३.७४ मीटर अंतरावर भाला फेकून तिसरे स्थान मिळवले.

 

नीरज चोप्रा याने गेल्या वर्षी डायमंड लीग स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. या हंगामात नीरजची कामगिरी चांगली राहिली आहे. नीरजने गेल्या महिन्यात पहिल्यांदा विश्व चॅम्पियनशिपचा किताब जिंकला होता. नीरजने यंदाच्या डायमंड लीगमध्ये पहिले स्थान पटकावले असते तर सुवर्णपदक राखणारा तो तिसरा खेळाडू ठरला असता. मात्र असे होऊ शकले नाही.

 

हे ही वाचा:

भाजपाची बी-टीम नेमकी कोणती? मोदी कोणाला वाचवतायत?

संसदेच्या विशेष सत्रापूर्वी आरएसएसच्या बैठकीत महिला आरक्षणावर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात भारी ! बायडेन सातव्या क्रमांकावर

भारत-कॅनडामधील संबंध ताणले

स्पर्धेत नीरजचा पहिला थ्रो ‘फाऊल’ ठरला. तो पहिल्या फेरीअखेरीस शेवटच्या स्थानी राहिला. तर, चेक गणराज्यच्या जाकुब वादलेच याने ८४.०१ मीटर दूर अंतरावर भाला फेकून पहिल्याच फेरीत पहिले स्थान पटकावले. त्यानंतर मात्र नीरजने शानदार कामगिरी केली. त्याने दुसऱ्या फेरीत ८३.२० मीटर अंतरावर भाला फेकून दुसरे स्थान पटकावले. तर, वादलेच याचा प्रयत्न ‘फाऊल’ ठरला. नीरजने तिसऱ्यांदा ८१.३७ मीटर अंतरावर भाला फेकला. तर, चौथा प्रयत्नही ‘फाऊल’ ठरला. पाचव्या प्रतत्नात नीरजने ८०.७४ मीटर अंतर गाठले तर, सहाव्या आणि अखेरच्या प्रयत्नात त्याने ८०.९० मीटर अंतरावर भाला फेकला.

 

 

नीरजने यंदाच्या दोहा डायमंड लीगमध्ये ८८.६७ मीटर अंतरावर भाला फेकला होता. तर, लुसान डायमंड लीगमध्ये ८७.६६ मीटर अंतरावर भाला फेकला होता. ज्यूरिख डायमंड लीगमध्ये ८५.७१ मीटर अंतर गाठून त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. तर, आता अमेरिकेतील ऑरेगनमध्ये ८३.८० मीटर अंतर गाठून त्यांनी दुसरे स्थान मिळवले.

Exit mobile version