वनडे वर्ल्डकपच्या ८ सामन्यांचे वेळापत्रक बदलले

नव्या वेळापत्रकाची घोषणा; सामन्याच्या तारखा वेळ बदलली

वनडे वर्ल्डकपच्या ८ सामन्यांचे वेळापत्रक बदलले

भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबरला होणार हे आधीच निश्चित झाले होते. त्याशिवाय आणखी आठ सामन्यांचे वेळापत्रक बदलले आहे.

भारत पाकिस्तान यांच्यातील सामना १५ ऑक्टोबरला खेळविला जाणार होता पण नंतर सुरक्षा व्यवस्थेची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या सामन्याचे वेळापत्रक बदलण्यात आले. एक दिवस आधी हा सामना खेळविला जाणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्डकपच्या पहिला सामना खेळविण्यात येईल तर तीन पूर्ण सदस्य असलेल्या बोर्डांनी काही सामन्यांच्या बाबत शंका उपस्थित केली होती. स्वतः बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी अशा शंका उपस्थित केल्याचे म्हटले होते. ज्या इतर सामन्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे ते सामने असे-

१० ऑक्टोबर – इंग्लंड वि. बांगलादेश (धरमशाळा)

१० ऑक्टोबर – पाकिस्तान वि. श्रीलंका (हैदराबाद)

१२ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका (लखनौ)

१३ ऑक्टोबर – न्यूझीलंड वि. बांगलादेश (चेन्नई)

१४ ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान (अहमदाबाद)

१५ ऑक्टोबर – इंग्लंड वि. अफगाणिस्तान (दिल्ली)

११ नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश (पुणे)

११ नोव्हेंबर – इंग्लंड वि. पाकिस्तान (कोलकाता)

१२ नोव्हेंबर – भारत वि. नेदरलँड्स (बेंगळुरू)

 

याआधी भारत नेदरलँड्स हा सामना ११ नोव्हेंबरला होणार होता पण आता तो १२ नोव्हेंबरला होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत १४ ऑक्टोबरला खेळविण्याचा निर्णय झाल्यानंतर इंग्लंड अफगाणिस्तान लढतही १४ ऑक्टोबरला न खेळविता १५ ऑक्टोबरला होणार आहे. रविवारी ही लढत होईल. पाकिस्तानची १२ ऑक्टोबरला होणारी लढतही आता १० ऑक्टोबरला खेळविण्यात येणार आहे.

बांगलादेश न्यूझीलंड सामना १४ ऑक्टोबरला चेन्नईत दिवसा खेळविण्यात येणार होता तो आता १३ ऑक्टोबरला होणार आहे. मात्र आता हाच सामना प्रकाशझोतात होईल.

 

वर्ल्डकपमधील भारताच्या लढती अशा

भारत वि. ऑस्ट्रेलिया ८ ऑक्टोबर (दिल्ली)

भारत वि. अफगाणिस्तान ११ ऑक्टोबर (दिल्ली)

भारत वि. पाकिस्तान १४ ऑक्टोबर (अहमदाबाद)

भारत वि. बांगलादेश १९ ऑक्टोबर (पुणे)

भारत वि. न्यूझीलंड २२ ऑक्टोबर (धरमशाला)

भारत वि. इंग्लंड २९ ऑक्टोबर (लखनऊ)

भारत वि. श्रीलंका २ नोव्हेंबर (मुंबई)

भारत वि. दक्षिण आफ्रिका ५ नोव्हेंबर (कोलकाता)

भारत वि. नेदरलँड्स १२ नोव्हेंबर (बेंगळुरू)

Exit mobile version