अजित पवारांनी अख्खी चुलचं फिरवली! राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी घेतली शपथ

अजित पवारांनी अख्खी चुलचं फिरवली! राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत शरद पवारांच्या नेतृत्वाला रामराम केला आहे. अजित पवारांनी चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांसोबत नऊ मंत्र्यांनी राजभवनात शपथ घेतली. पहाटेचा शपथविधी आजून जनता विसरली नाही आणि तोच आता दुपारच्या शपथविधी चर्चेचा विषय ठरली आहे. अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे ,धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

महाराष्ट्रातील राजकारणात कधीही काहीही घडू शकत याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजची अजित पवारांची दुपारची शपथविधी. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झालेला पाहायला मिळाला.मागील वर्षी ठाकरे यांच्या शिवसेनेमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. या सरकारला स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. पक्षांअंतर्गत नाराजी असल्यामुळे शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून बाहेर पडले. मागील काही दिवसापूर्वी अजित पवार पक्षात नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यानंतर अजित पवार भाजपात येणार असल्याची चर्चा सुरु झाली.

हे ही वाचा:

“मी अजित अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की…”

पवारांचा गुगली आणि फडणवीसांचा यॉर्कर…सोशल मीडियात प्रतिभेला महापूर

पुण्यात कोयत्याची दहशत; वाद झाला आणि तरुणाने थेट कॉलेजमध्येच कोयता नेला

फ्रान्समध्ये आंदोलकांकडून ऍपल, नायकीच्या दुकानांची लूट

त्यानंतर आज अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.त्यांच्या सोबत इतर ९ मंत्र्यांनी देखील शपथ घेतली.या शपथविधीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उभी फूट पडलेली दिसून येते. अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या ३० ते ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे वृत्त आहे. अजित पवार यांनी शपथ घेतल्याने महाराष्ट्रात आता दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांचाही मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. यामध्ये छगन भुजबळ ते दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे. याशिवाय मंत्रिपद मिळालेल्या नेत्यांमध्ये हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबूराव आत्राम आणि संजय बनसोडे यांचा समावेश आहे.

राजकीय पक्ष चिन्ह अजितपवारांकडेच

शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राजकीय पक्ष आणि चिन्ह माझ्याकडे आहे असं म्हणाले. आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपासोबतही जाऊ शकतो. बहुतांश आमदार, नेत्यांना आमचा निर्णय मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालो आहोत असं अजित पवार म्हणाले.

Exit mobile version