बिहारमध्ये १५ जणांना नेणाऱ्या रिक्षाला अपघात; ९ ठार!

पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरु

बिहारमध्ये १५ जणांना नेणाऱ्या रिक्षाला अपघात; ९ ठार!

बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात एका अज्ञात वाहनाने ऑटोरिक्षाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान ९ जण ठार झाले आहेत.तर सहा जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

रामगढ चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिहारौरा गावाजवळ २० फेब्रुवारीच्या रात्री हा अपघात झाला. लखीसराय-सिकंदरा मुख्य रस्त्यावर पहाटे १.३० ते २ च्या दरम्यान हा अपघात झाला.अज्ञात वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिली. त्यानंतर ऑटोचा स्फोट झाला. अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरडा आणि गोंधळ उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात आलेल्या या ऑटोमध्ये एकूण १५ लोक प्रवास करत होते.यावेळी झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला तर अन्य जण जखमी झाले.मृतांमध्ये ८ लोक मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहेत.हे लोक केटरिंगचे काम करायचे.

हे ही वाचा:

राम मंदिरात दरमहा कोट्यवधी रुपयांची देणगी, मोजणीसाठी ‘हायटेक मशिन्स’चा वापर!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रसंगावधान; मुलीचे वाचवले प्राण!

राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा ब्रेक के बाद

रेडिओचा आवाज हरपला; अमीन सयानी यांचे निधन

 

आपले काम आटोपून सिकंदरा येथून लखीसरायला येत असताना हा अपघात झाला.मनोज कुमार असे ऑटोचालकाचे नाव असून त्याचाही अपघातात जागीच मृत्यू झाला.ते महिसोना गावाचे रहिवासी होते.ऑटोचालकासह विकास कुमार,विनय कुमार, दिवाना कुमार, अमित कुमार, मोनू कुमार, रोहित पासवान, अनुज कुमार आणि चेतन यांचाही अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

ऑटो आणि अज्ञात वाहनाची धडक झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच आजूबाजूच्या अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरु आहे.

Exit mobile version