पुण्यातून धक्कादायक घटनेची माहिती समोर आली आहे. खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मुली धरणात बुडाल्याची घटना समोर आली आहे. या नऊ मुलींपैकी सात मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. परंतु, दोन मुलींचा मृत्यू झाला आहे.
खडकवासला येथील हवेली तालुक्यामधील गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत धरणात आज सकाळी नऊ मुली पोहण्यासाठी उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच्या सर्व नऊ मुली पाण्यात बुडू लागल्या. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी धाव घेतली. नऊ पैकी सात मुलींना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले पण सोळा ते सतरा वर्षांच्या दोन मुलींचा शोध लागला नाही.
#UPDATE | Maharashtra: Two girls who were missing after drowning in Khadakwasla dam in Pune district were found dead: Pune Rural Administration pic.twitter.com/NrCDqHBZCc
— ANI (@ANI) May 15, 2023
हे ही वाचा:
“उद्धव ठाकरेंची अवस्था दरबारातल्या सरदारासारखी”
कर्नाटकमधील काँग्रेस विजयाच्या व्यूहरचनेचा हा शिल्पकार
कर्नाटकात उपमुख्यमंत्री आणि पाच मंत्रीपदे मुस्लिमांना द्या
जयंत पाटलांना ईडीकडून दुसरं समन्स
स्थानिकांनी या घटनेची माहिती हवेली पोलीस ठाण्याला दिली. घटनेची माहिती मिळताच खडकवासलाचे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम आणि पोलीस हवालदार दिनेश कोळेकरांना घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.