आयपीएस अधिकारी नीना सिंग यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.सीआयएसएफच्या महिला प्रमुख बनणाऱ्या नीना सिंग देशातील पहिल्या महिला आहेत.आयपीएस अधिकारी नीना सिंग सध्या सीआयएसएफचे विशेष डीजी म्हणून कार्यरत आहेत.देशभरातील विमानतळ,दिल्ली मेट्रो स्टेशन,सरकारी भवन येथील सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफकडे असते.
नीना सिंग सध्या दिल्लीतील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) मुख्यालयात विशेष महासंचालक (DG) म्हणून नियुक्त आहेत. यापूर्वी, १९८६ च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) बिहार केडरचे अधिकारी शीलवर्धन सिंग यांची नोव्हेंबर २०२१ मध्ये सीआयएसएफच्या विशेष महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यात एनएसजी कमांडोसह पाच हजार पोलीस तैनात!
अबूधाबीच्या हिंदू मंदिराचे मोदी करणार उद्घाटन
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या दादरच्या दुकानदारांवर बडगा!
आगामी काळात इस्रो ५० उपग्रह अवकाशात सोडणार
केंद्राने १९८८ -बॅचचे IPS अधिकारी अनिश दयाल सिंग यांची केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चे महासंचालक म्हणून ३१ डिसेंबर २०२४ रोजी सेवानिवृत्ती होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत नियुक्ती केली आहे, असे कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय, केंद्राने १९८९ -बॅचचे IPS अधिकारी राहुल रसगोत्रा यांची ३० सप्टेंबर २०२५ च्या निवृत्ती तारखेपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) चे महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
कोण आहेत नीना सिंग?
नीना सिंग या मूळच्या पाटणा, बिहारच्या असून त्या राजस्थान केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्या याआधी राजस्थानच्या डीजीही होत्या. याआधी त्यांनी केंद्र सरकारमध्येही काम केले होते.तसेच केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) मध्ये सहसंचालक म्हणून काम केले आहे. त्यांचे पती रोहित कुमार हे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत.