गुजरातमधील एक अधिकारी २००९ पासून लोकसभा निवडणुकीत सातत्याने आपले कर्त्यव्य बजावत आहे.परंतु, २०२४ ची लोकसभा त्याच्यासाठी खूप खास असणार आहे.कारण पहिल्यांदाच या निवडणूक प्रक्रियेत तो अधिकारी एक महिला बनून काम करणार आहे.या अगोदरच्या निवडणुकीत त्याने पुरुष म्हणून काम केले आहे.मात्र यावेळी तो एका महिलेच्या रूपात आपल्या कर्तव्य पार पाडणार आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, वडोदरा येथील उप मामलतदार ‘निलेश मेहता’ आता ‘बिजल मेहता’ बनले आहेत.२०२० मध्ये त्यांच्यावर लिंग शस्त्रक्रिया झाली.२००९ ते २०१९ या तीन लोकसभा निवडणुकीत त्यांनी ‘निलेश’ म्हणून काम केले आहे.मात्र, यंदाच्या २०२४ च्या निवडणुकीत ‘बिजल’ काम करणार आहेत.
हे ही वाचा:
पालघर: खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश!
झारखंड रोकड जप्ती प्रकरणी मंत्र्यांच्या पीएसहित नोकरास अटक!
सलमान खान गोळीबार प्रकरणी पाचवा आरोपी राजस्थानमधून गजाआड
कसाबचे कौतुक करायचे असेल तर पाकिस्तानात जा!
निलेशचा बिजल झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली.बिजल म्हणाल्या की, महिला म्हणून माझे कर्तव्य बजावण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.माझे सहकारी मला खूप सहकार्य करतात.बिजल मेहता या वडोदरा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेत तैनात आहेत.त्यांच्याकडे नामांकन आणि वेबकास्टिंगसह अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत.दरम्यान, महाराष्ट्रामध्ये देखील अशीच एक घटना घडली होती.ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील कॉन्स्टेबलवर लिंग बदलाची शस्त्रक्रिया पार पडली होती.या शस्त्रक्रियेनंतर ललिता साळवेचा ललितकुमार साळवे झाला होता.