तब्बल दहा वर्षे जेतेपदाच्या हुलकावणी नंतर प्रतिष्ठेच्या ‘स्पार्टन मुंबई श्री’ किताबावर परब फिटनेसच्या निलेश दगडेने आपले नाव कोरले. ग्रेटर बॉम्बे मॉडीबिल्डर्स असोसिशन आणि मुंबई सबर्बन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या स्पार्टन मुंबई श्री २०२३ च्या स्पर्धेत निवेशने आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले. त्याने ७० आणि ८५ विणे वजनगटातील विजेते अनुक्रमे उमेश गुप्ता आणि अनिकेत पाटील यांना आपल्या जवळपासही फिरकू दिले नाही. त्याचा विजय अगदीच एकतर्फी झाला.
‘१००’ हा ट्रंक नंबर असणार्या निलेशने आपल्याकडे असणार सौष्ठव हे यावेळी शंभर नंबरी सोने असल्याचा दाखला दिला. त्याच्या भीमकाय देहयष्टीने इतर गटातील सात विजेत्यांना अक्षरश: खुजे ठरविले. निलेशला यंदा कोणतेच आव्हान असणार नाही याची कल्पना खेळातील जाणकार प्रेक्षकांना’ प्री-जजिंग’च्या दरम्यानच आली होती. निलेश उंची, त्याच्या स्नायूंचे मोठे आकारमान आणि खास करून अप्पर बॉडीमुळे तो स्टेजवर येताच ‘हाच तो विजेता’ असे प्रेक्षकांचे मत शंभर टक्के बनले. ‘हंड्रेड, हंड्रेड,हंड्रेड च्या जयघोषाने अंधेरीचे शहाजीराजे क्रीडा संकुल दणाणून गेले.
निलेशकडून पराभूत झालेल्या उमेश गुप्ता (यु.जी. फिटनेस) आणि अनिकेत पाटील (सावरकर जिम) यांना पुढील काळात हा किताब जिंकण्यासाठी केवढी तयारी करावी लागेल याचा जणू पाठच शिकावयास मिळाले. उमेश त्याच्या ७० किलो गटामध्ये निर्विवाद विजेता होता, तीच गोष्ट ८५ किलो गटात अनिकेत पाटीलची. उमेशच्या पिंडर्या पट (मांड्या) आणि हॅमस्ट्रिंग’ (मांडीचे मागचे स्नायू) पाहण्याजोगे होते. अनिकेतचे प्रमाणबद्ध शरीर त्याला अव्वल स्थान देऊन गेले. या दिमाखदार स्पर्धेचा पुरस्कार सोहळा शरीरसौष्ठव संघटनेचे अमोल कीर्तीकर, अजय खानविलकर, राजेश सावंत, सुनिल शेगडे, विजय झगडे आणि स्पर्धेचे पुरस्कर्ते ऋषभ चोक्सी यांच्या उपस्थितीत पार पडला.
हे ही वाचा:
राहुल गांधींनी १० जन्म घेतले तरी ते सावरकरांसारखे होऊ शकणार नाहीत
हिंदूफोबिया अर्थात, हिंदूद्वेषाविरोधात अमेरिकतल्या जॉर्जियात ठराव
उमेश पाल हत्येप्रकरणी अतिकचा मेहुणा पोलिसांचा पाहुणा!
पोलाद उत्पादनात ‘सेल’चे विक्रमी उत्पादन
महिलांमध्ये हर्षदा सरस
अलिकडच्या काळात महिला व्यायामाकडे वळू लागल्याने त्यांच्यासाठी घेतल्या जाणार्या स्पर्धा महिला वर्गाला प्रेरणादायी ठरु लागल्या आहेत. प्रेक्षकांमध्ये महिलांचे वाढते प्रमाण आणि प्रत्यक्ष सहभाग लक्षणीय ठरत आहे. महिलांच्या शरीरसौष्ठवामध्ये हर्षदा पवार (हर्क्युलस फिटनेस) हिने आपले वर्चस्व राखताना आपल्याच जिममधील किमया बेर्डेला मागे टाकले. तर महिलांच्या फिजिक स्पोर्टसमध्ये रेणुका जनौतीने बाजी मारली. यामध्ये स्पर्धकांच्या शरीराचे एकूणच ‘सौंदर्य’ याला महत्त्व असते.
अलंकार, अनिकेतला यश
आजकाल ‘आयटी’ क्षेत्रात कॉम्प्युटर’च्या विळख्यात अडकलेला युवा वर्ग व्यायामाला महत्त्व देऊ लागला आहे. याचे प्रमाण मेन्स फिजिक स्पर्धेमध्ये पाहावयास मिळाले. १७० सेंटिमीटर आणि १७० सेंटिमीटरवरील गटामध्ये अनिकेत सावंत (बॉडी वर्कशॉप) आणि अलंकार पिंगळे (दांडेश्वर व्यायामशाळा) यांनी कडव्या लढती अंती विजेतेपद जिंकली. आकाश जाधव आणि मिनेश ठक्कर (मांसाहेब जिम) उपविजेते ठरले.