अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या माजी उमेदवार आणि दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली यांनी त्यांच्या इस्रायल भेटीदरम्यान केलेल्या एका कृतीने वादाला तोंड फोडले आहे. लेबनॉनसह इस्रायलच्या उत्तरेकडील सीमेचा दौरा करताना, हेली यांनी ‘त्यांना संपवून टाका’ या संदेशासह इस्रायली क्षेपणास्त्रांवर स्वाक्षरी केली. यावेळी त्यांच्यासोबत संयुक्त राष्ट्रातील इस्रायलचे माजी राजदूत डॅनी डेनन हेदेखील उपस्थित होते. इस्रायलने गाझामध्ये केलेल्या हल्ल्यात सुमारे १५ हजार मुलांसह ३६ हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
राफाह येथील विस्थापित पॅलेस्टाइन नागरिकांच्या छावण्यांवर इस्त्रायलने नुकत्याच केलेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला आहे. इतक्या भयानक संख्येने गाझामधील नागरिक मृत्युमुखी पडले असताना हेलीने इस्रायलला पाठिंबा दर्शविला आणि दक्षिणी गाझा शहर राफावरील इस्रायली हल्ल्याला परावृत्त करण्यासाठी शस्त्रांचा पुरवठा तात्पुरता रोखल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनावर टीका केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय (आयसीसी) आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीए) यांचाही निषेध केला. या न्यायालयांत अनुक्रमे नेतान्याहू यांच्या अटकेचा आणि इस्रायलविरुद्ध नरसंहाराच्या आरोपांवर खटला चालवण्याचा विचार सुरू आहे.
हे ही वाचा:
अरविंद केजरीवाल यांचे खोटे पुन्हा उघड
प्रवाशांचे होणार मेगा हाल! मध्य रेल्वेवर ६३ तास आणि ३६ तासांचे दोन मेगाब्लॉक
डॉ. बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल
स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी फाडला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो!
‘इस्रायलला मदत न करण्याचा निश्चित मार्ग म्हणजे शस्त्रे रोखणे. इस्रायलला मदत न करण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे जे घडते त्याचा निषेध करण्याऐवजी आयसीसी, आयसीजे किंवा इस्त्रायलची निंदा करणाऱ्यांपैकी कोणाचीही स्तुती करणे हा आहे,’ निक्की हेली यांनी ‘द गार्डियन’ला अशी प्रतिक्रिया दिली.‘अमेरिकेने इस्रायलला जे काही हवे आहे ते करावे आणि हे युद्ध कसे लढायचे हे सांगणे थांबवावे. तुम्ही एकतर मित्र आहात किंवा मित्र नाही,’ असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी दक्षिण इस्रायलचाही दौरा केला.
७ ऑक्टोबरच्या हमासने केलेल्या हल्ल्यातून वाचलेल्या नागरिकांचीही त्यांनी भेट घेतली. ७ ऑक्टोबरच्या हमास हल्ल्यात अंदाजे १२०० जणांचा मृत्यू झाला आणि आणखी २५३ जणांचे अपहरण झाले.
क्षेपणास्त्रावर स्वाक्षरी करतानाचा निक्की हेली यांचे छायाचित्र आणि क्षेपणास्त्रावरील संदेश अनेक जणांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले होते. मृत्यू आणि विनाशाला कारणीभूत ठरणाऱ्या क्षेपणास्त्रांवर स्वाक्षरी करणाऱ्या हेली यांच्यावर अनेकांनी टीका केली.