महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेले मुंबई हे ऐतिहासिक शहर आहे. मुंबई हे जगप्रसिद्ध शहर असून देशा-विदेशातून लोक मुंबईमध्ये पर्यटनासाठी येत असतात. भारतातील अनेक जणांचे पसंतीचे पर्यटन स्थळ म्हणून मुंबईची ओळख आहे. या पार्श्ववभूमीवर मुंबईतील रात्रीच्या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून १३ स्थळे निश्चित करण्यात आली आहेत.
महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी मुंबईत ‘नाईट टुरिझम’वर भर देण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून निविदेचे काम अंतिम टप्प्यात आहे.
आकडेवारीनुसार मुंबईत दरवर्षी चार लाख विदेशी पर्यटक येत असतात. या पर्यटकांपैकी अनेकजण रात्रीच्या वेळी मुंबईत फिरणे पसंत करतात. अनेक ऐतिहासिक वास्तू अंधारमय असल्याने पर्यटक तिकडे फिरकण्यास पाठ फिरवतात. त्यामुळे या स्थळांची विशेष सजावट व विद्युत रोषणाई केल्यास पर्यटकांची कल या स्थळांकडे वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जातं आहे. रात्रीच्या वेळी या सर्व स्थळांवर फिरण्याकरिता पर्यटकांसाठी ओपन डेक बसची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. याशिवाय सेल्फी पॉईंटची निर्मितीदेखील वारसा स्थळानजीक करण्यात येणार आहे.
हे ही वाचा
रशियन सैन्य तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ११ सैनिकांचा मृत्यू
रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’
नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले
‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’
‘नाईट टुरिझम’साठी पर्यटन संचालनालयाकडून मुंबईतील तेरा ऐतिहासिक स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये सीएसएमटी रेल्वे स्थानक, मुंबई उच्च व दिवाणी न्यायालय, मुंबई विद्यापीठ, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, गेटवे ऑफ इंडिया, मुंबई महापालिका मुख्यालय, जीपीओ इमारत, पीडब्ल्यूडी इमारत, सेंट झेवियर्स कॉलेज, पोलिस महासंचालनालय, मरिन ड्राईव्ह या स्थळांचा समावेश आहे.