खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत निधी सिंगची कमाल

जिंकली दोन सुवर्ण पदके

खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत निधी सिंगची कमाल

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२२, २९ ते ३१ मे २०२३ दरम्यान लखनौ येथे आयोजित करण्यात आले होते. निधी सिंगने ४०० मीटर, ४०० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्ण आणि ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये कांस्य पदक मिळवले. निधीने ४०० मीटरमध्ये वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. वैयक्तिक स्पर्धांमध्ये २ सुवर्णपदके आणि स्पर्धेत ३ पदके जिंकणारी निधी ही एकमेव खेळाडू आहे.

सानिका नाटेने ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये कांस्यपदक मिळवले. सानिकाने शर्यतीला उत्कृष्ट सुरुवात करून दिली. आकांक्षा गावडे हिने ४ बाय ४०० मीटर रिलेच्या पहिल्या लेगमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली. तिने वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी केली..निधी, सानिका आणि आकांक्षा यांनी मुंबई विद्यापीठाला द्वितीय उपविजेते बनवण्यात योगदान दिले विशेषतः निधीचे योगदान मोठे होते.

निधी म्हणाली, “मी माझ्या कामगिरीने खूप खूश आहे. जून महिन्यात होणाऱ्या वरिष्ठ आंतरराज्य ऍथलेटिक चॅम्पियनशिप आणि जागतिक विद्यापीठ चाचणीसाठी ही चांगली तयारी असेल. ”

हे ही वाचा:

हिंदू नावाचा वापर करून त्याने मॉडेलला फसवले, पण द केरळ स्टोरीने दिली तिला प्रेरणा

निफाडमध्ये लव्ह जिहाद, मुलीला अजमेरला पळवले

विरोधकांनी नव्या संसदभवनाकडे तोंड फिरवले; पण चीनने केले कौतुक

रेल्वेत मिळाला २ लाखांचा फोन, त्याने विकला ३५०० रुपयांना…

“निधी खूप चांगली कामगिरी करत आहे. तिने ४०० मीटरमध्ये वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली ज्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढेल. मला खात्री आहे की ती ४०० मीटर हर्डल्समध्येही चागला कामगिरी करेल. सानिका आणि आकांक्षा यांनी आपापल्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली, अशी प्रतिक्रिया तिचे प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी दिली आहे.

Exit mobile version