निधी सिंगची जागतिक विद्यापीठ गेम्ससाठी निवड

चीनमध्ये होणार आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धा

निधी सिंगची जागतिक विद्यापीठ गेम्ससाठी निवड

ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेतली खेळाडू निधी सिंग हिची २८ जुलै ते ०८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत चेंगडू, चीन येथे होणार्‍या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. निधी सिंग ही ठाणे जिल्ह्यातील पहिली ऍथलीट आहे या स्पर्धेत सहभागी हो्णारी. निधी सिंग ४०० मीटर हर्डल्स आणि ४ x ४०० मीटर रिलेमध्ये सहभागी होणार आहे.

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आणि सीनियर इंटर स्टेट अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे तिची निवड निश्चित करण्यात आली.

निधीने यासंदर्भात सांगितले की, मी ४ वर्षानंतर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. मी खरोखर आनंदी आहे. आता स्पर्धेत माझे सर्वोत्तम देणे हेच ध्येय आहे.” निधी सिंगचा हंगाम यंदा चांगला गेला. ती खूप मेहनत घेत आहे. निधीचा अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धा, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्णपदकांसह जबरदस्त कामगिरी केली आहे.

हे ही वाचा:

‘आम्ही सलमान खानला ठार मारूच’ गँगस्टर गोल्डी ब्रार याची दर्पोक्ती

एकाच स्कूटरवर सात जणांचा कुटुंबकबिला घेऊन जाणाऱ्याला अटक

पुतिन म्हणाले की, म्हणून ‘वॅगनर’ बंडखोरांना सोडले

पालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अनिल परबांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मला विश्वास आहे की निधी जागतिक विद्यापीठ खेळांमध्ये चांगली कामगिरी करेल, असे तिचे प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी सांगितले. निधी ही २४ वर्षांची खेळाडू आहे. तिने बीएमएस, एमकॉम केले आहे. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येते. तिचे वडील निवृत्त असून आई गृहिणी आहे. ती तिच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आणि तिचा खर्च भागवण्यासाठी अर्धवेळ नोकरीही करत आहे. त्याशिवाय, खेळासाठी वेळ देत ती खेळात चांगली कामगिरीही करून दाखवत आहे.

Exit mobile version