एनआयएची राज्यात छापेमारी, एक तरुण ताब्यात!

दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा संशय

एनआयएची राज्यात छापेमारी, एक तरुण ताब्यात!

राष्ट्रीय एजन्सी एनआयएने आज महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात केलेल्या छापेमारी व कारवाईनंतर इसिस मॉड्युल हे पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या रडारवर आलेला आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये एनआयएने छापा टाकला आहे. एका विद्यार्थ्याची एनआयए पथकाकडून चौकशी सुरू आहे. विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा संशय आहे. अमरावतीबरोबर पुणे- गुलटेकडी येथे राहणाऱ्या तरुणाची एनआयएकडून चौकशी एनआयएने केली आहे.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये एनआयएच्या पथकाकडून छापेमारी करून एका १९ वर्षीय युवकाला घेतलं ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या १९ वर्षीय युवकाची अमरावती येथील जोग क्रीडा संकुल मधील मंथन हॉल याठिकाणी चौकशी सुरू आहे. एनआयएने ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या घरून काही कागदपत्रे आणि लपटॉप आणल्याची माहिती समोर आली आहे. अचलपूरच्या अकबरी चौक मधील बियाबानी गल्लीतून तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

हे ही वाचा:

मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वंकष प्रयत्न

दाऊदच्या बातमीनंतर डोंगरीत सन्नाटा…

नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा

अहमदनगर-कल्याण महामार्गावर अपघात,आठ जणांचा मृत्यू!

तसेच पुण्यात १९ वर्षीय तरूणाची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सॅलिसबरी पार्कमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय साफवान शेख विद्यार्थ्याची एनआयएकडून सोमवारी चौकशी करण्यात आली आहे. त्याचे मोबाईल आणि इलेक्ट्रॅानिक डिव्हाइस जप्त करण्यात आले आहे. बंगळुरुमधील इसिस मॅाड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तो सहभागी झाला. संबधित तरुणाची कसून चौकशी एनआयएचे पथक करत आहे. विद्यार्थ्यांच्या चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या कर्नाटकात ११ ठिकाणी, महाराष्ट्रात तीन ठिकाणी, झारखंडमध्ये चार ठिकाणी आणि दिल्लीत एका ठिकाणी एनआयएसोबत राज्यांच्या पोलिसांसोबत छापेमारी सुरू आहे.दरम्यान,या आधी १३ डिसेंबर रोजी एनआयएने लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या दहशतवाद्यांनी कैद्यांच्या कट्टरपंथीकरणाच्या संदर्भात केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने बेंगळुरूमध्ये सहा ठिकाणी छापे टाकले. ऑक्टोबरमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून चार आरोपी आणि अन्य दोन संशयितांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. या चार आरोपींपैकी एक आरोपी अद्याप फरार आहे. एनआयएच्या पथकाने मोहम्मद उमर, मोहम्मद फैसल रब्बानी, तनवीर अहमद आणि मोहम्मद फारूक तसेच फरार जुनैद यांच्या घरांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये अनेक डिजिटल उपकरणे, गुन्ह्यातील कागदपत्रे आणि ७.३ लाख रुपये रोख जप्त केले होते.

 

Exit mobile version