देशात सात बुलेट ट्रेन मार्गिकांची तयारी

देशात सात बुलेट ट्रेन मार्गिकांची तयारी

सरकारने देशभरात सात नव्या बुलेट ट्रेन मार्गिकांसाठी डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्याच्या कामास मंजूरी दिली आहे. देशभरातील विविध ठिकाणी बुलेट ट्रेन मार्गिका चालू करण्याचा विस्तृत अहवाल नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) तर्फे केले जाणार आहे. मात्र यापैकी एकाही मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झालेली नाही.

हे ही वाचा:

भारताकडे येणार ड्रोन्सची ताकद

लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात केंद्रिय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की, रेल्वेने एनएचएसआरसीएलला सात बुलेट ट्रेन मार्गिकांच्या अहवालाच्या कामाला परवानगी दिली आहे.

सात मार्गिका पुढीलप्रमाणे आहेत:

१. दिल्ली- नोएडा- आग्रा- कानपूर- लखनौ- वाराणसी

२. दिल्ली- जयपूर- उदयपूर- अहमदाबाद

३. मुंबई- नाशिक- नागपूर

४. मुंबई- पुणे- हैदराबाद

५. चेन्नई- बंगळूरू- म्हैसुर

६. दिल्ली- चंदिगढ- लुधियाणा- जलंधर- अमृतसर

७. वाराणसी- पटना- हावडा

गोयल यांनी सांगितले की यापैकी कोणत्याही मार्गिकेचे काम सुरू झालेले नाही.

त्यांनी हे देखील सांगितले, कोणत्याही द्रुतगती मार्गाचे काम त्या मार्गाच्या विविध निकषांनुसार करण्यात येणार आहे. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजूनही या मार्गिकांचे डीपीआर आणि मार्ग नक्की करण्यात आलेले नाहीत. एनएचएसआरसीएल सध्या मुंबई- अहमदाबाद या ५०८ किमी लांबीच्या मार्गिकेचे काम करत आहे.

Exit mobile version