एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या काळात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादनाला वेग आला आहे. प्रकल्पासाठी लागणारी जवळपास सर्व जमीन आता संपादित केली जात आहे. ९५% पेक्षा जास्त भूसंपादन पूर्ण झाल्यामुळे, नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड या ५०८ किलोमीटर लांबीच्या सर्वात मोठ्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी निविदा आमंत्रित केल्या आहेत.
वांद्रे कुर्ला संकुल-शिळफाटा या २१ किलोमीटर भुयारी मार्गासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. आता महाराष्ट्र- गुजरात सीमेवरील शिळफाटा ते झारोळी या उरलेल्या १३५ किलोमीटरच्या मार्गासाठीही या निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणखी गती मिळाली आहे. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत १४ मार्च २०२३ असून १५ मार्च २०२३ ला निविदा खुली होणार आहे.
या निविदेमध्ये शिळफाटा ते झरोली जोडणाऱ्या ठाणे, विरार आणि बोईसर येथील तीन उन्नत स्थानकांना जोडणाऱ्या राज्यातील १३५.४५ किमी उन्नत मार्गांचे बांधकाम समाविष्ट आहे. महाराष्ट्रातील इतर दोन पॅकेजसाठी- मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे १,०२८ किमी भूमिगत स्टेशनचे डिझाइन आणि बांधकाम आणि बीकेसी स्टेशन ते शिळफाटा दरम्यान २०.३७ किमी भूमिगत बोगद्याच्या निविदा आधीच मागवण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा :
क्रोएशियातही आता मल्लखांब रोवला!
विनयभंगप्रकरणी आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असले पाहिजे
हेमंत सोरेन चौकशीला या! ईडीने पाठवले दुसरे समन्स
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रगती अहवालानुसार महाराष्ट्रात आवश्यक जमिनीपैकी ९५.४५ टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये हे प्रमाण केवळ ७५.२५ टक्के होते.
अडीच वर्षे फुकट गेली नाहीतर..
यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर शरसंधान केले आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, ठाणे विरार आणि बोईसर बुलेट ट्रेन प्रकल्पातील शेवटची केवळ ३ स्टेशन उभारणे बाकी आहे. १३५.४५ किमीच्या पिलर्ससाठी निविदा बाहेर पडली आहे. मधली २.५ वर्षे फुकट गेली म्हणून नाहीतर आज हीच बुलेटट्रेनच्या उद्घाटनाची जाहिरात प्रसिद्ध झाली असती. धन्यवाद मोदी सरकार धन्यवाद शिंदे फडणवीस सरकार.