‘टेटेपटू मनिका बात्राला का वगळले त्याची कारणे द्या!’

‘टेटेपटू मनिका बात्राला का वगळले त्याची कारणे द्या!’

आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्राची निवड न झाल्याच्या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी सुनावणी झाली. सुनावणी करताना हायकोर्टाने म्हटले की, मनिका ही सर्वोच्च रँकिंगची खेळाडू आहे आणि तिच्या मागणीचा क्रीडा मंत्रालयाने विचार केला पाहिजे. यासंबंधीची पुढील सुनावणी बुधवारी (२२ सप्टेंबर) होणार आहे.

भारतीय टेबलटेनिस पटू मनिका बत्रा आणि भारतीय टेनिस महासंघ (टीटीएफआय) यांच्यात टोकियो ऑलिम्पिकनंतर सुरू झालेल्या वादाने आता नवे वळण घेतले आहे. नुकतेच फेडरेशनने ‘एशियन चॅम्पिअनशिप’ स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली. मात्र त्या यादीतून मनिका बत्राचे नाव वगळण्यात आले त्यामुळे मनिका हिने न्यायालयात धाव घेतली होती. ऑलिम्पिकनंतर नॅशनल कॅम्पमध्ये तिने सहभाग घेतला नव्हता त्यामुळे तिचे नाव यादीतून वगळण्यात आल्याचे मनिकाने न्यायालयात सांगितले.

हे ही वाचा:

आज होणार हसन मुश्रिफांचा आणखीन एक घोटाळा उघड

जॅवलिन एक प्रेमकथा…नीरज चोप्राच्या जाहिरातीचा धमाका

पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर महिला आयएएस अधिकाऱ्याने काय केला होता आरोप?

किरीट सोमैय्या यांना कराडमध्ये केले स्थानबद्ध

टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्यावेळी मनिकाने राष्ट्रीय मार्गदर्शक सौम्यदीप राय हे आपल्या वैयक्तिक सामन्याच्या वेळी सोबत नको, असे सांगितले होते. त्यावरून भारतीय टेबल टेनिस महासंघाने मनिकाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. ऑलिम्पिक पात्रता टेबल टेनिस स्पर्धेत राष्ट्रीय मार्गदर्शक सौम्यदीप राय यांनी काही सामन्यात जाणून बुजून हार धरण्यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळेच ते मला मार्गदर्शक म्हणून नको होते, असा गंभीर आरोप मनिकाने केला होता.

ऑलिम्पिकनंतर आयोजित केलेल्या नॅशनल कॅम्पमध्ये मनिकाने सहभाग घेतला नव्हता त्यामुळे तिचे नाव यादीतून वगळण्यात आल्याचे मनिकाने न्यायालयात सांगितले. फेडरेशनने या कॅम्पमध्ये खेळाडूंचा सहभाग अनिवार्य असेल असे सांगितले होते.

Exit mobile version