वृत्तपत्र छायाचित्रकार प्रशांत नाडकर यांचे निधन !

नाडकर यांच्या अनेक छायाचित्रांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

वृत्तपत्र छायाचित्रकार प्रशांत नाडकर यांचे निधन !

गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून कार्यरत असलेले प्रशांत नाडकर (४८) यांचे शुक्रवार, ५ मे रोजी प्रतीक्षा नगर येथील निवासस्थानी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. नाडकर हे मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी कार्यकारणी सदस्यही होते.

प्रशांत नाडकर हे १९९८ पासून इंडियन एक्स्प्रेस समूहात वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून कार्यरत होते. गेल्या चार वर्षांपासून ते दुर्धर आजाराने ग्रस्त होते. आजारपणातच दृष्टीवर परिणाम होऊनही न खचता त्यांनी आपले काम सुरू ठेवले.
करोनाकाळात नाडकर यांनी मुंबईतील लोकडाऊन आणि रुग्णालयातील परिस्थितीचे चित्र कॅमेऱ्यात कैद केले. नंतर दृष्टीवर खूपच परिणाम झाल्याने त्यांना काम पुढे सुरू ठेवता आले नाही. प्रकृतीत सुधारणा होत असतांनाच शुक्रवारी त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

हे ही वाचा:

यूपी संस्कृत बोर्डाच्या परीक्षेत १४,००० मुलांना मागे टाकत मुस्लिम विद्यार्थी अव्वल !

‘द केरळ स्टोरी’ पहिल्याच दिवशी सुपरहिट!

सुरक्षा दलाला यश, बारामुल्लामध्ये दहशतवाद्याचा खात्मा

इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनच्या राज्याभिषेक सोहळ्याला हिंदू धर्मगुरूंची उपस्थिती

मुंबईत २६ जुलै २००५ रोजी अतिवृष्टीच्या हाहाकारात प्रतिकूल परिस्थितीतही नाडकर यांनी आपले छायाचित्रणाचे कर्तव्य बजावले,. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर मुंबईत झालेला बंद, मुंबईतील लोकल रेल्वे बॉम्बस्फोट, मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला, भुजचा भूकंप, राजकीय घडामोडी आदी विविध महत्त्वपूर्ण घटनांची त्यांनी छायाचित्रे टिपली होती. नाडकर यांच्या अनेक छायाचित्रांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

Exit mobile version