न्यूज २४ वृत्तवाहिनीने एक पोस्ट शेअर करून भाजपच्या हैदराबाद मतदारसंघाच्या उमेदवार माधवी लता यांनी सर्व मुस्लिमांसाठी आरक्षणाची मागणी केल्याचा दावा केला. मजकूर आणि पोस्टरचा समावेश असलेल्या या पोस्टमध्ये भाजप नेत्या माधवी लता यांचे वक्तव्य नमूद करण्यात आले आहे. ‘अरब, सय्यद आणि शिया मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही. आम्ही सर्व मुस्लिमांसाठी आरक्षणाची मागणी करत आहोत,’ असे वक्तव्य यात नमूद केले आहे.
मात्र माधवी लता यांनी आपण असा दावा केलाच नाही, असे स्पष्ट करून डया चॅनेलने त्यांच्या नावाने अफवा आणि खोटी वक्तव्ये पसरवल्याबद्दल खेद व्यक्त केला.
‘भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार के. माधवी लता गरू यांनी जे वक्तव्य केले, असे वृत्तवाहिनीकडून सांगितले जात आहे, ते त्यांनी कोणत्याही व्यासपीठावर केलेले नाही. आम्ही लोकांना विनंती करू इच्छितो की, अशा अफवांना बळी पडू नका आणि आम्ही अशा कोणत्याही वक्तव्याचे खंडन करतो. नामांकित राष्ट्रीय स्तरावरील वृत्तवाहिनी अशा प्रकारे अफवा पसरवते आहे, हे पाहून खेद वाटतो,’ असे माधवी लता यांच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतर न्यूज २४ने ही मानवी चूक असल्याचा दावा करत ही पोस्ट हटविली.
हे ही वाचा:
चकमकीत मारल्या गेलेल्या माओवाद्यांचा मोठ्या हल्ल्याचा कट होता
मुलीची हत्या झालेल्या काँग्रेस नगरसेवकाची नड्डा यांनी घेतली भेट
बुरखा घालणं, कपाळावर कुंकु न लावणं याबाबतीत दबाव टाकून कर्नाटकात धर्मांतराचा प्रयत्न
यापुढे मी शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही!
ही पोस्ट अनवधानाने झालेली चूक असल्याचे वाहिनीने माफीनामा जारी केला. “प्रिय मॅडम, हे ट्विट मानवी चुकांमुळे घडले आणि ते हटवण्यात आले आहे. अनवधानाने झालेल्या या चुकीबद्दल आम्ही दिलगीर आहोत,’ अशा शब्दांत या वृत्तवाहिनीने माफी मागितली आहे.तथापि, अनेक नेटिझन्सनी या पोस्टसाठी न्यूज चॅनेलची निंदा केली आणि खोट्या बातम्या पसरवणारी पोस्ट ही ‘मानवी चूक’ असल्याच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले.
‘वृत्तवाहिनी असल्याने तुम्हाला ही चूक मान्य आहे असे वाटते का? आणि मानवी चूक? मला खात्री आहे की तुम्ही पोस्ट केलेल्या गोष्टी तुम्ही सर्व तपासता किंवा तुम्ही नंतर माफी मागण्यासाठी कशाही पोस्ट करता का?’ असा प्रश्न एका यूजरने उपस्थित केला. तर, दुसऱ्याने लिहिले, “काँग्रेस नेत्यांच्या मालकीचे चॅनल खोटे बोलत आहे. गुन्हा दाखल झाल्याशिवाय हे घाणेरडे पत्रकार थांबणार नाहीत,’ अशा शब्दांत त्याने समाचार घेतला.