झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, त्यांच्या निधनाचे वृत्त खोटे असल्याचे आता समोर आले आहे. माजी गोलंदाज हेन्री ओलोंगा यांनी बुधवार, २३ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली होती. परंतु, काही काळानंतर त्यांनी पुन्हा ट्वीट करून हीथ स्ट्रीक जिवंत असल्याची माहिती दिली.
झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांचे कर्करोगामुळे निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. माजी क्रिकेटपटू आणि हीथ स्ट्रीक यांचे मित्र हेन्री ओलोंगा यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. त्यांच्या ट्वीटनंतर जगभरातून शोक व्यक्त होऊ लागला. दरम्यान, अनेक माध्यमांनी याची माहिती आणि बातम्या प्रसिद्ध केल्या. मात्र, आता हीथ जिवंत असल्याचे वृत्त सोर येताच निधनाचे वृत्त खोटे असल्याचे उघड झाले आहे.
ओलोंगा यांनी एका चॅटचा स्क्रीनशॉट ट्वीट केला असून त्यात तो जिवंत असल्याचं सांगण्यात आलं आहे. ओलोंगा यांनी आधीचे त्यांचे ट्वीट डिलिट केले आहे. “हीथ स्ट्रीकच्या निधनाचे वृत्त अफवा असून तो जिवंत असल्याचे मी त्याच्याकडूनच जाणून घेतले आहे,” असं ट्वीट ओलोंगा यांनी केले आहे.
हे ही वाचा:
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण बंद
विक्रोळीतील पालिका शाळेतील चार विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार
चांद्रयानाच्या लँडिंगचा ऐतिहासिक क्षण घरबसल्या अनुभवता येणार
महिला पोलिस आणि मुलगी घरी मृतावस्थेत; पतीचा मृतदेह झाडावर
हीथ स्ट्रीक यांना झिम्बाब्वेचे महान क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळखले जाते. २००० ते २००४ दरम्यान त्यांनी देशाचे नेतृत्व केले. त्यांनी ६५ कसोटी सामने आणि १८९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. झिम्बाब्वेकडून कसोटी सामन्यांत १०० विकेट घेणारा तो एकमेव क्रिकेटर आहे. स्ट्रीक यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९९३ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात झाली होती. २००५ साली त्यांनी निर्वृत्ती घेतली. निवृत्तीनंतर ते झिम्बाब्वे, स्कॉटलंड, बांग्लादेश, गुजरात लायन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांना प्रशिक्षण देत होते.