अटल सेतूवर भेगा पडल्याचे वृत्त खोटे!

एमएमआरडीएने लाइव्ह व्हिडीओ शेअर करून दिली माहिती

अटल सेतूवर भेगा पडल्याचे वृत्त खोटे!

मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी न्हावा शेवा अटल सेतूवरून राजकारणाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अटल सेतूच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केला आहे. तर, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने या आरोपांत तथ्य नसल्याचा दावा केला आहे. अटल सेतूच्या मुख्य भागावर कोणत्याही भेगा नाहीत, असा दावा एमएमआरडीएने केला आहे. वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांतून याबाबत अफवा पसरवल्या जात असून त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. याबाबतचा व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

काय बोलले फडणवीस?
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, अटलसेतूवर कोणत्याही भेगा पडल्या नसून त्याला कोणताही प्रकारचा धोका नाही. हे छायाचित्र पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे आहे. मात्र काँग्रेस पक्षाने असत्याचा आधार घेऊन भेगा असल्याचे सांगत मोठी योजना आखली आहे. निवडणूक काळात राज्यघटना बदलण्याचे वक्तव्य, निवडणुकीनंतर फोनच्या माध्यमातून ईव्हीएम अनलॉक करणे आणि अशा प्रकारची खोटी वक्तव्ये केली जात आहेत. देशातील नागरिक या काँग्रेसच्या अशा भ्रष्ट कृतीचा बीमोड करेल.

हे ही वाचा:

अमेरिकेत किराणा दुकानात झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू, १० जण जखमी!

इस्रायल-हमासदरम्यान भीषण युद्धाला सुरुवात!

अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

पाकिस्तानच्या तुलनेत भारताचा परकीय चलन साठा ७१.७४ पट मोठा

एमएमआरडीएचे म्हणणे काय?
अटलसेतूच्या रस्त्यावर तीन महिन्यांतच भेगा पडल्याचा आणि एका भागात अर्ध्या किमीपर्यंतचा रस्ता खचल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे. त्यानंतर एमएमआरडीएने स्पष्टीकरण दिले आहे. अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्यावर किरकोळ भेगा पडल्या आहेत. हा पदपथ मुख्य पुलाचा भाग नाही आणि पुलाला जोडणारा एक सर्व्हिस रोड आहे. या भेगा प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे पडलेल्या नाहीत आणि त्यामुळे पुलाला कोणताही धोका नाही. प्रकल्पाचे संचालन आणि देखभाल करणाऱ्या पथकाला २० जून २०२४ रोजी पाहणीदरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रॅम्प क्रमांक ५वर तीन ठिकाणी किरकोळ भेगा दिसल्या. त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे, असे एमएमआरडीएने सांगितले.
त्यानुसार कंत्राटदारने याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हे काम २४ तासांत पूर्ण होईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

काँग्रेसचा आरोप
अटल सेतूवर भेगा पडल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. नाना पटोले यांनी आरोप केल्यानंतर यावरून चर्चा सुरू झाली. मात्र एमएमआरडीएने स्पष्टीकरण दिल्यानंतर या चर्चांना विराम मिळाला आहे.

Exit mobile version