‘डंका’ आता हिंदीतही वाजणार

‘डंका’ आता हिंदीतही वाजणार

‘राष्ट्रवादाचा बुलंद आवाज’ हे ब्रीद घेऊन पत्रकारितेचे व्रत घेतलेला ‘न्यूज डंका’ आता हिंदीतही येत आहे. अवघ्या काही दिवसांतच मराठीत प्रचंड लोकप्रिय झालेला न्यूज डंका हिंदीतही सुरू व्हावा अशी मागणी वाचकांकडून सातत्याने केली जात होती. ती प्रतिक्षा आता २ मे रोजी संपणार आहे.

१२ जानेवारी २०२१ अर्थात विवेकानंद जयंतीच्या दिवशी ‘न्यूज डंका’ या माराठी वेब चॅनलची सुरूवात झाली. ‘राष्ट्रवादाचा बुलंद आवाज’ असे ब्रीद मिरवणारा हा चॅनल अल्पावधितच प्रचंड लोकप्रिय झाला. शंभर दिवसांत सव्वा सहा लाखापेक्षा जास्त हिट्स घेण्याचा पराक्रम मराठी वेबसाईटने केला. डंका आता हिंदीतही यावा यासाठी जनतेतून मागणी होत होती. अखेर २ मे ला हिंदी डंकाची सुरूवात होणार आहे.

हे ही वाचा:

चार धाम यात्रा रद्द

आसाम पुन्हा हादरले

“भारताला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे”, प्रिन्स चार्ल्स

कोविडकाळात नागरिकांना सैन्याची साथ

२ मे २०२१ ला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आंदमान मुक्तीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. याच दिवसाचे औचित्य साधून हिंदी न्यूज डंकाचे लोकार्पण पार पडणार आहे. खरं तर हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडावा अशी सगळ्यांचीच इच्छा होती. पण कोविड परिस्थितीचा विचार करता न्यूज डंकाच्या साईटचे केवळ डिजिटल उदघाटन होणार आहे.

Exit mobile version