आता ‘कू’ वर ही वाजणार ‘डंका’

आता ‘कू’ वर ही वाजणार ‘डंका’

राष्ट्रवादाचा बुलंद आवाज आता ‘कू’ ॲपवरही दुमदुमणार आहे. न्यूज डंकाचे अधिकृत खाते आता ‘कू’ ॲपवरही तयार झाले असून ‘डंका’ च्या बातम्या आता ‘कू’ ॲपवाराही वाचता येणार आहेत. ‘कू’ हे अस्सल स्वदेशी ॲप सोशल मीडियाच्या दुनियेत भारताला आत्मनिर्भर बनवण्याकडे टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे.

‘कू’ हे ऍप २०२० साली प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले असून अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमसाठी हे ऍप उपलब्ध आहे. ऑगस्ट २०२० मध्ये या ऍपला भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत ऍप इनोव्हेशन चॅलेंजमध्ये पुरस्कारही मिळाला होता. सध्या तीस लाखांपेक्षा जास्त लोक हे ऍप वापरत आहेत. भारत सरकारच्या अनेक विभागांनी आणि मंत्र्यांनी ‘कू’ ॲप वर आपली अकाउंट्स उघडली असून अनेक सेलेब्रिटीही आता या ॲप वर येत आहेत.

‘डंका’ ची भूमिका
“पूर्णतः स्वदेशी असणाऱ्या ‘कू’ ॲपला भारतीयांचा भरभरून प्रतीसाद मिळत आहे. भारताला सोशल मीडियाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारे हे एक महत्वाचे पाऊल आहे. आजचा जमाना सोशल मीडियाचा आहे. मीडियाच्या क्षेत्रात कार्यरत असताना सोशल मीडियावर अस्तित्व टिकवून असणे गरजेचे आहे. पण ‘कू’ ॲप वर असणे हे सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.”
– दिनेश कानजी (संपादक – न्युज डंका)

Exit mobile version