‘राष्ट्रवादाचा बुलंद आवाज’ हे ब्रीद घेऊन पत्रकारितेचे व्रत घेतलेला ‘न्यूज डंका’ आता हिंदीतही येत आहे. अवघ्या काही दिवसांतच मराठीत प्रचंड लोकप्रिय झालेला न्यूज डंका हिंदीतही सुरू व्हावा अशी मागणी वाचकांकडून सातत्याने केली जात होती. ती प्रतिक्षा आता २ मे रोजी संपणार आहे. पण ‘न्यूज डंका हिंदी’ नेमका कसा असणार याची उत्सुकता तमाम वाचकांना लागली आहे.
राष्ट्रवादी विचारांनी भारलेली पत्रकारिता ही मराठी डंकाची ओळख आहे. तशीच पत्रकारिता हिंदी न्यूज डंकामध्ये लोकांना पहायला मिळेल. ‘राष्ट्र प्रथम’ याच बाण्याने हिंदी डंकाचेही कामकाज चालेल. मराठीप्रमाणेच हिंदीतही प्रत्येक क्षेत्राशी निगडीत बातम्या वाचकांना वाचायला मिळणार आहेत. यात राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, साहित्य, गुन्हेगारी जगत, आंतरराष्ट्रीय घडामोडी अशा सर्व प्रकारच्या बातम्या वाचायला मिळणार आहेत. तर विविध विषयांवरचे व्हिडिओसुद्धा पहायला मिळणार आहेत.
हे ही वाचा:
लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या खरंच कमी झाली?
मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हमधून चित्र अस्पष्टच!
प्रशांत किशोर संन्यास घेणार की यु टर्न?
बंगालमध्ये ९६ जागा ठरणार निर्णायक
२ मे २०२१ ला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आंदमान मुक्तीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. याच दिवसाचे औचित्य साधून हिंदी न्यूज डंकाचे लोकार्पण पार पडणार आहे. खरं तर हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडावा अशी सगळ्यांचीच इच्छा होती. पण कोविड परिस्थितीचा विचार करता न्यूज डंकाच्या साईटचे केवळ औपचारिक लोकार्पक होणार आहे.