न्यूज डंका हिंदी…अवघ्या काही तासांतच

न्यूज डंका हिंदी…अवघ्या काही तासांतच

‘राष्ट्रवादाचा बुलंद आवाज’ असणारा न्यूज डंका आता हिंदीत पदार्पण करतोय. अवघ्या काही तासांतच ‘न्यूज डंका हिंदी’ चे अनावरण होणार आहे. २ मे १९२१ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अंदमानातून मुक्तता करण्यात आली होती. या महत्वाच्या प्रसंगाच्या शताब्दीचे औचित्य साधून ‘न्यूज डंका हिंदी’ वाचकांच्या भेटीला येत आहे.

१२ जानेवारी २०२१ अर्थात विवेकानंद जयंतीच्या दिवशी ‘न्यूज डंका’ या माराठी वेब चॅनलची सुरूवात झाली. ‘राष्ट्रवादाचा बुलंद आवाज’ असे ब्रिद मिरवणारा हा चॅनल अल्पावधितच प्रचंड लोकप्रिय झाला. अवघ्या काही दिवसांतच काही लाख हिट्स घेण्याचा पराक्रम मराठी वेबसाईटने केला. डंका हिंदीतही यावा यासाठी जनतेतून मागणी होत होती. अखेर २ मे ला हिंदी डंकाची सुरूवात होणार आहे. ‘न्यूज डंका हिंदी’ ची प्रचंड उत्सुकता वाचकांना लागलेली आहे.

हे ही वाचा:

सुनील मानेला वाटते आहे तुरुंगाची भीती

चक्क एकाच प्रवाशासाठी विमानाचे उड्डाण

भारत आयात करणार रेमडेसिवीरचे डोसेस

स्पुतनिक-वी भारतात दाखल

शनिवार, १ मे रोजी ‘न्यूज डंका हिंदी’ ची झलक दाखवणारा व्हिडिओ डंकाच्या वाचकांसाठी प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडीओत ‘न्यूज डंका’ चे मुख्य संपादक दिनेश कानजी, प्रमुख मार्गदर्शक प्रशांत कारूळकर आणि सल्लागार संपादक आमदार अतुल भातखळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Exit mobile version