28 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरविशेषवनडे वर्ल्डकपमधील न्यूझीलंड संघातील खेळाडूंच्या नातेवाईकांची अनोखी जाहिरात

वनडे वर्ल्डकपमधील न्यूझीलंड संघातील खेळाडूंच्या नातेवाईकांची अनोखी जाहिरात

न्यूझीलंड क्रिक्रेट बोर्डाने क्रिकेट रसिकांची मने जिंकली

Google News Follow

Related

भारतात खेळवल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवस विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. ऑक्टोबर महिन्यात या स्पर्धेचे बिगुल वाजेल. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी बहुतेक देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. स्पर्धा कोण जिंकेल ते जिंकेल परंतु न्यूझीलंड क्रिक्रेट बोर्डाने क्रिकेट रसिकांची मने जिंकली आहेत. ती त्यांच्या अनोख्या स्टाइलने केलेल्या संघाच्या निवडीच्या घोषणने. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

 

 

विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंड बोर्डाने अगदी हटके पद्धतीने आपल्या संघाची घोषणा केली. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओचे सर्व क्रिकेट फॅनकडून कौतुक केले जात आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून अनेक कमेंटसही केल्या आहेत.

 

 

क्रिकेट संघाची घोषणा करताना पत्रकार परिषद घेतली जाते. या पत्रकार परिषदेत संघाचा कर्णधार, सिलेक्टर घेऊन संघात कोण कोण खेळणार आहेत, त्यांची नावे घोषित करतात. परंतु न्यूझीलंड संघाने या नेहमीच्या संकल्पनेला ठेंगा दाखवत अनोख्या पद्धतीने आपल्या खेळांडूची घोषणा केली आहे.

हेही वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोटार उत्पादकांना दिला हा सल्ला

स्पाइसजेटच्या प्रमुखांना सुनावले; आधी भरपाई द्या, तुमच्या मरणाची आम्हाला चिंता नाही

इसीसच्या पुणे मॉड्युलमधील फरार संशयितांवर प्रत्येकी ३ लाखाचे इनाम

व्यावसायिक हेमंत पारीख अपहरण प्रकरणी राजस्थानातील टोळीला अटक

न्यूझीलंड संघातील खेळाडूंच्या कुटुंबातील व्यक्तीची नाव घोषणा करण्यासाठी वापर केला. त्याचा व्हिडिओ बनवला गेला. या व्हिडिओत खेळाडूंच्या पत्नी, मुलं, होणारी भावी पत्नी, आजी, आई-वडील जर्सी नंबर आणि नाव सांगताना दिसत आहेत. या व्हिडिओची सुरुवात विल्यमसनची पत्नी आणि त्याच्या दोन मुलांपासून करण्यात आली आहे. या व्हिडिओत टीम साउदीच्या दोन मुलींसोबत त्यांचा पाळीव कुत्राही दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अशा मोठ्या दिमाखात न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाची घोषणा विश्वचषकासाठी केलेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा