21.9 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरविशेषन्यूझीलंडला हव्यात २८० धावा आणि भारताला ९ बळी

न्यूझीलंडला हव्यात २८० धावा आणि भारताला ९ बळी

Google News Follow

Related

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी रंगतदार स्थितीत आहे. कानपूर येथे सुरू असलेल्या या कसोटीत भारताने आपला दुसरा डाव ७ बाद २३४ धावांवर घोषित केल्यानंतर न्यूझीलंडपुढे चौथ्या दिवशी २८४ धावांते लक्ष्य ठेवण्यात आले असून त्याला उत्तर देताना पाहुण्यांनी एक विकेट गमावून ४ धावा केल्या आहेत. त्यामुळे पाहुण्यांना विजयासाठी २८० धावांची आवश्यकता आहे तर भारताला ही लढत जिंकण्यासाठी न्यूझीलंडचे ९ बळी घ्यावे लागतील.

दुसऱ्या डावात भारताची अवस्था ५ बाद ५१ अशी असताना मुंबईकर श्रेयस अय्यरने ६५ धावांची खेळी करून भारताला सावरले. पहिल्या डावात पदार्पणातच शतकी खेळी श्रेयसने केली होती. श्रेयसप्रमाणेच वृद्धिमान साहाची नाबाद ६१ धावांची खेळी तसेच आर. अश्विनच्या ३२ धावाही महत्त्वाच्या ठरल्या. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात अर्धा संघ गारद करणाऱ्या अक्षर पटेलने २८ धावा जोडल्या. त्यामुळे भारताने २३४ धावसंख्येपर्यंत मजल मारली. पहिल्या डावातील ४९ धावांची आघाडी भारताकडे होती. त्यामुळे २८४ धावांचे लक्ष्य भारताने पाहुण्या किवींपुढे ठेवले.

भारताच्या दुसऱ्या डावात ५-५१ अशी अवस्था झालेली असताना श्रेयसने अश्विनसह अर्धशतकी भागीदारी करत भारतीय डावाला आकार दिला. अश्विन बाद झाल्यावर त्याने वृद्धिमान साहाच्या साथीने आणखी एक अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे भारताने दीडशेचा टप्पा ओलांडला. नंतर श्रेयसचा अडसर दूर करण्यात न्यूझीलंडच्या साऊदीला यश आले. त्यानंतर वृद्धिमान साहा आणि अक्षर पटेल यांनी अभेद्य भागीदारी रचत भारताला २३४ धावसंख्येपर्यंत नेले.

न्यूझीलंडला आता आणखी २८० धावांची गरज असली तरी त्यांनी एक फलंदाज गमावला आहे. अश्विनने त्यांच्या विल यंगला पायचीत पकडून चौथ्या दिवसाच्या अखेरीस हादरा दिला. आता न्यूझीलंडच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी विजय मिळणार की, भारत त्यांना रोखण्यात यशस्वी होणार हे स्पष्ट होईल.

 

हे ही वाचा:

‘83’  चित्रपटाच्या नवीन पोस्टरची चर्चा

मथुरामध्ये जमावबंदी! कृष्ण जन्मभूमीवरील मशिदीचा वाद पुन्हा येणार ऐरणीवर?

गोव्याला नमवून महाराष्ट्राच्या किशोर खोखो संघाची विजयी सलामी

तीन पक्षांचा तमाशा!

 

स्कोअरबोर्ड : भारत पहिला डाव ३४५ आणि ७ बाद २३४ डाव घोषित (श्रेयस अय्यर ६५, वृद्धिमान साहा ना. ६१, अश्विन ३२, अक्षर पटेल ना. २८, कायले जॅमिसन ४०-३, टिम साऊदी ७५-३) वि. न्यूझीलंड पहिला डाव २९६ आणि दुसरा डाव १ बाद ४ (टॉम लॅथम खेळत आहे २, विल्यम समरविले खेळत आहे ०, अश्विन ३-१)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा