न्यूझीलंडने तिसऱ्या टी-२० मध्ये पाकिस्तानचा ७ गडी राखून धुव्वा उडवला

न्यूझीलंडने तिसऱ्या टी-२० मध्ये पाकिस्तानचा ७ गडी राखून धुव्वा उडवला

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना रविवारी (२१ एप्रिल) रावळपिंडी येथे खेळला गेला. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा ७ विकेटने धुव्वा उडवला. दुसरा टी-२० हरलेल्या न्यूझीलंडने तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारली. मार्क चॅपमनने न्यूझीलंडला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने २०७.१४ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना नाबाद ८७ धावा ठोकून काढल्या.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने २० षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात १७८ धावा केल्या. संघासाठी शादाब खानने २० चेंडूत ४० धावांची आक्रमक खेळी खेळली, त्यात ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. न्यूझीलंडकडून ईश सोधीने सर्वाधिक विकेट घेतल्या.

न्यूझीलंडचा सहज विजय
१७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने १८.२ षटकात ३ गडी राखून सहज विजय मिळवला. सलामीवीर टिम सेफर्ट आणि टिम रॉबिन्सन यांनी न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३० चेंडूत ४२ धावांची भागीदारी केली. किवी संघाला पहिला झटका टीम सेफर्टच्या रूपाने बसला. तो अब्बास आफ्रिदीच्या गोलंदाजीवर ५ व्या षटकात बाद झाला. सेफर्टने १६ चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह २१ धावा केल्या. त्यानंतर सहाव्या षटकात नसीम शाहने टिम रॉबिन्सनला त्रिफळाचीत केले. रॉबिन्सनने १९ चेंडूंत ५ चौकारांसह २८ धावा केल्या.

हेही वाचा :

चकमकीत मारल्या गेलेल्या माओवाद्यांचा मोठ्या हल्ल्याचा कट होता

22 apr 2024

‘ईडीच्या कार्यक्षमतेत २०१४नंतर सुधारणा’

चीनधार्जिणे मोइझ्झू यांच्या पक्षाचा विजय

यानंतर मार्क चॅपमन आणि डीन फॉक्सक्रॉफ्ट यांनी तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या ६८ चेंडूत ११७ धावांची आक्रमक भागीदारी करत सामना न्यूझीलंडच्या बाजूने नेला. किवींना चौथा धक्का अठराव्या षटकात बसला. फॉक्सक्रॉफ्ट २९ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

यानंतर मार्क चॅपमन आणि जेम्स नीशम यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद ९ धावांची भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. चॅपमनने ४२ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या.

Exit mobile version