26 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरविशेषगतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

न्यूझीलंडकडून नऊ गडी राखून धुव्वा

Google News Follow

Related

सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे आणि आणि राचिन रवींद्र यांच्या नाबाद तडाखेबंद शतकांमुळे न्यूझीलंडने गुरुवारी गतविजेत्या इंग्लंडवर नऊ विकेटने सहज विजय नोंदवत एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत धडाकेबाज सुरुवात केली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगलेल्या या सलामीच्या सामन्यात डेव्हॉन याने नाबाद १५२ तर राचिन याने १२३ धावांची नाबाद खेळी करून इंग्लंडचे २८३ धावांचे लक्ष्य ३६.२ षटकांतच गाठून न्यूझीलंडला विजयपथावर नेले.

कर्णधार केन विल्यम्सनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडचे नेतृत्व करणाऱ्या टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजीचे आमंत्रण दिले. इंग्लंडने ५० षटकांत ९ बाद २५३ अशी धावसंख्या उभारली होती. न्यूझीलंडचा २३ वर्षीय डावखुरा फलंदाज राचिन रविंद्र याने १२३ धावांची नाबाद खेळी केली. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शतक ठोकणारा तो सर्वांत तरुण खेळाडू ठरला. तर, भारतीय खेळपट्ट्या आणि हवामानाची सवय असलेल्या कॉनवे याने दुसऱ्या विकेटसाठी १५२ धावांची तडाखेबंद खेळी केली. या दोघांनी २७३ धावांची दिमाखदार भागीदारी केली. विशेष म्हणजे या दोघांची ही खेळी आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च नाबाद खेळी ठरली. तर, एकूण स्पर्धेतील चौथी सर्वोच्च खेळी ठरली.

या दोघांनी ३० चौकार आणि सहा षटकार खेचत इंग्लंडला जराही उसंत मिळू दिली नाही. मार्क वूडच्या पाच षटकांत तर ५५ धावा कुटल्या गेल्या. सॅम कुरान हा विकेट घेणारा एकमेव गोलंदाज ठरला. त्याने सहा षटकांत ४७ धावा दिल्या. इंग्लंडचे दोन्ही फिरकीपटू आदिलरशिद आणि मोईन अली अपयशी ठरले. या दोघांच्याही गोलंदाजीवर राचिन याने तडाखेबंद फटके लगावले.

तत्पूर्वी इंग्लंडचे फलंदाज जॉनी बेअरस्टो (३३) आणि डेव्हिड मलान (१४) यांनी ४० धावांची सलामी दिली. तर, नंतर आलेले हॅरी ब्रूक (२५) आणि मोईन अली (११) यांनाही फारसे योगदान देता आले नाही. जो रूट याने ७७ धावांची तर, कर्णधार जोस बटलर याने ४३ धावांची खेळी करत इंग्लंडचा डाव सावरला. परंतु ते सामन्यावर पूर्ण वर्चस्व मिळवू शकले नाहीत. तळाचे फलंदाजही पारशी चमक दाखवू न शकल्याने इंग्लंडचा डाव २८२ धावांवर आटोपला.

इंग्लंडची पुढील लढत ९ ऑक्टोबर रोजी नेदरलँडविरुद्ध हैदराबादमध्ये होणार आहे. तर, १० ऑक्टोबरला धर्मशाला येथे त्यांचा सामना बांगलादेशविरुद्ध होईल.

हे ही वाचा:

संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही

खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या धाकट्या भावाला समन्स

लेझर लाईटनंतर डीजेच्या आवाजामुळे पोलिसांना कानाचा त्रास

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल लोकसभेतून निलंबित

आत्मविश्वासावर परिणाम नाही

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर या पराभवामुळे नाउमेद झालेला नाही. सलामीच्या सामन्यातील पराभवाचा संघाच्या आत्मविश्वासावर परिणाम होणार नाही, असा विश्वास त्याने व्यक्त केला. ‘न्यूझीलंडविरुद्ध आमची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. न्यूझीलंडने सर्वच प्रकारांत आमच्यापेक्षा सरस खेळ केला. हा पराभव स्वीकारणे अवघड आहे. मात्र हा केवळ एक पराभव आहे. ही स्पर्धा दीर्घकाळ चालणार आहे. आम्ही एका पराभवानंतर फार निराश होणार नाही,’ असे बटलर म्हणाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा