23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषअयोध्येत भव्य राम मंदिर ते लोकसभा निवडणुका...

अयोध्येत भव्य राम मंदिर ते लोकसभा निवडणुका…

२०२४मध्ये घडणार या महत्त्वाच्या घटना

Google News Follow

Related

सन २०२४मध्ये अशा महत्त्वाच्या घटना घडणार आहेत, ज्याकडे संपूर्ण भारतीय नागरिकांचे लक्ष असेल. देशाचे पुढील पाच वर्षांचे भवितव्य ठरवणाऱ्या लोकसभा निवडणुकांसह अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासह खेळ, विज्ञान क्षेत्रांतही बऱ्याच घडामोडी होणार आहेत.

रामाचे आगमन
राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची ऐतिहासिक घटना म्हणून नोंद होईल. २२ जानेवारी रोजी मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर मंदिर सर्व भाविकांसाठी खुले होईल.

इंडिया विरुद्ध एनडीएची परीक्षा
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करू शकतात. नऊ वर्षांहून अधिक काळ सत्तेत राहिलेले भाजप सरकार आता तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यास उत्सुक आहेत.

विधानसभा निवडणुकांची धामधूम
या वर्षी आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू होणार आहे. तर, वर्षअखेरीस सप्टेंबरमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर, ऑक्टोबरमध्ये हरयाणा आणि महाराष्ट्रात निवडणुका होऊ शकतात. तर, झारखंडमध्येही निवडणुका होतील.

हे ही वाचा:

रामलल्लाच्या बालरूपासारख्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होणार

१३ हजार फूट उंचीवर फडकला राममंदिराच्या चित्राचा ध्वज

योगी आदित्यनाथ, श्रीराम मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मुंबईत अक्षता कलश यात्रांचे आयोजन

अमेरिकेमध्ये पहिल्यांदा टी-२० विश्वचषक स्पर्धा
यंदा टी २० विश्वचषक स्पर्धा ४ ते ३० जूनपर्यंत आयोजित केली जाणार आहे. यंदा या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद संयुक्तरीत्या वेस्ट इंडिज आणि अमेरिका भूषवणार आहे. यंदा पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेचे यजमानपद अमेरिका भूषवणार आहे. तर, इंडियन प्रीमिअर लीग २९ मार्च २०२४ ते २६ मेपर्यंत खेळवली जाईल.

ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक
२०२४मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत. २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४पर्यंत ही स्पर्धा होईल. भारताला कुस्ती, बॉक्सिंग, भालाफेक, हॉकीसारख्या खेळांमध्ये पदकाच्या आशा आहेत.

इस्रोही मिळवणार नवे यश
१ जानेवारी २०२४ रोजी इस्रो एक्सपौसेट मिशन प्रक्षेपित करेल. त्यानंतर इन्सॅट-३डीएस प्रक्षेपणासाठी सज्ज असेल. याद्वारे हवामानाचे अंदाज अधिक चांगल्या प्रकारे वर्तवले जातील. निसार फेब्रुवारीमध्ये प्रक्षेपित होऊ शकते. हा उपग्रह रिमोट सेन्सिंग क्षेत्रात क्रांती आणेल. दर १२ दिवसांनी तो जगभरातील देशांचे मॅपिंग करेल. गगनयान मिशन २०२४च्या अखेरपर्यंत प्रक्षेपित होऊ शकेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा