सरकारकडून भारतीय कुस्ती संघ निलंबित!

संजय सिंग यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांना क्रीडा मंत्रालयाकडून स्थगिती

सरकारकडून भारतीय कुस्ती संघ निलंबित!

भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या, ज्यामध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले आणि कुस्तीपटू अनिता शेओरान यांचा पराभव झाला. यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली. ब्रिजभूषण यांच्यासारखा कोणीतरी आता कुस्ती संघटनेचा अध्यक्ष झाला आहे, असे साक्षी मलिक म्हणाल्या होत्या.याशिवाय संजय सिंह निवडून आल्यानंतर बजरंग पुनिया यांनी त्यांचा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर ठेवला होता आणि पत्रही लिहिले होते. कुस्तीगीरांची मागणी लक्षात घेऊन सरकारने आता नव्या कुस्ती संघटनेला निलंबित केले आहे.

कुस्ती संघटना रद्द करतानाच क्रीडा मंत्रालयाने संजय सिंगने घेतलेल्या सर्व निर्णयांना स्थगितीही दिली आहे. क्रीडा मंत्रालयाने पुढील आदेश येईपर्यंत कोणतेही नवे निर्णय घेण्यास बंदी घातली आहे. डब्ल्यूएफआयबाबत दिलेल्या सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, जणू काही जुने अधिकारीच सर्व निर्णय घेत आहेत.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीर; नमाझ पढत असताना निवृत्त वरिष्ठ पोलिसाची दहशतवाद्यांकडून हत्या

उदयनिधीनंतर दयानिधींना उबळ, ‘उ. प्र., बिहारमधले हिंदीभाषिक तमिळनाडूत शौचालये स्वच्छ करतात’

‘बृजभूषण यांचा निकटवर्तीय असलो तरी मी डमी उमेदवार नाही’

‘खासदारांचा जाणुनबुजून गोंधळ’; निलंबनाबाबत राज्यसभाध्यक्ष खर्गे यांच्याशी चर्चा करणार!

क्रीडा मंत्रालयाने आपल्या निर्देशात म्हटले आहे की, “डब्ल्यूएफआयच्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाने घेतलेले निर्णय पूर्णपणे नियमांच्या विरोधात आहेत आणि हे निर्णय डब्ल्यूएफआय आणि राष्ट्रीय क्रीडा विकास संहितेच्या तरतुदींचे उल्लंघन करणारे आहेत. हे निर्णय मनमानीपणा दर्शवतात.अधिकृत प्रसिद्धीपत्रकात, क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे की राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा घाईघाईने करण्यात आली आणि नियमांचे पालन केले गेले नाही.

क्रीडा मंत्रालयाच्या कारवाईबाबत बजरंग पुनिया म्हणाला की, मला अद्याप याबाबत माहिती नाही. जर हा निर्णय घेतला असेल तर तो अगदी योग्य आहे.जर आपल्या बहिणी आणि मुलींच्या बाबतीत असे काही घडत असेल तर अशा लोकांना महासंघातून काढून टाकले पाहिजे. अलीकडेच कुस्ती संघटनेने ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिपची घोषणा केली होती.ही स्पर्धा उत्तर प्रदेशातील गोंडा येथे २८ डिसेंबर पासून सुरु होणार होती.

Exit mobile version