७ ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या सात महिलांचा व्हिडीओ इस्रायलने जाहीर केला आहे. हा व्हिडीओ सर्वांत प्रथम होस्टेजेस फॅमिलीज फोरमने जाहीर केला आहे. ‘ते हमासच्या दहशतवाद्यांकडे २३० दिवसांहून अधिक दिवस ओलीस आहेत. या तरुण मुलींच्या वाट्याला कोणते दुःख आले असेल, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो,’ असे या तीन मिनिटांच्या व्हिडीओच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
पाच महिला सैनिकांचे नाहाल ओझ तळावरून अपहरण करण्यात आले होते. या महिलांचे चित्रिकरण करण्यासाठी हल्लेखोरांनी त्यांच्या शरीरावर कॅमेरे परिधान केले आहेत. या महिलांची नावे लिरी अल्बग, करिना अरीव, आकम बर्गर, डॅनिअल गिल्बोआ आणि नामा लेव्ही अशी आहेत.
हे ही वाचा:
डोंबिवलीच्या एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; परिसरातील इमारतीच्या काचा फुटल्या
आरोपी विशाल अग्रवाल म्हणतो, मुलाला गाडी देऊन चूक केली!
निफ्टी २३ हजार जवळ, सेन्सेक्सची १ हजार अंकांनी उसळी!
‘युट्यूबर’ बनविण्याचे आश्वासन देऊन हिंदू मुलीला अडकवले जाळ्यात!
या व्हिडीओत या महिलांनी पायजमा परिधान केला असून त्या एका भिंतीला टेकून उभ्या असल्याचे दिसत आहेत. त्यांचे हात बांधले असून त्यांच्या चेहऱ्यावर रक्तही आहे. एक दहशतवादी या महिलांकडे बोट दाखवून म्हणतोय, ‘या मुली, महिला गर्भवती होऊ शकतात. या सर्व झिओनिस्ट्स आहेत.’ तर, दुसरा दहशतवादी एकीला ‘तू खूप सुंदर आहेस’ असे म्हणत आहे. या महिलांना नंतर जमिनीवर बसण्यास सांगितले जात आहे. तर, एक ओलीस महिला ‘माझे पॅलेस्टाइनमध्ये मित्र आहेत,’ असे सांगताना दिसत आहे. त्यावर ‘आमची भावंडे तुमच्यामुळे मेली. आम्ही तुम्हालाही मारून टाकू,’ असा दुसरा दहशतवादी म्हणताना ऐकू येत आहे. त्यानंतर या महिलांना एकामागोमाग एक जीपमध्ये बसवले जात आहे.
‘द होस्टेजेस फॅमिलीज फोरम’ने हा व्हिडीओ प्रसिद्ध करून इस्रायली सरकारने त्वरित पुन्हा हमासशी चर्चा सुरू करावी, अशी मागणी केली आहे. या पाच सैनिकांच्या नातेवाइकांच्या मते हा मूळ व्हिडीओ १३ मिनिटांचा आहे. मात्र त्यातील संवेदनशील चित्रणामुळे तो कापण्यात आल्याचे सांगण्यात आले.