१२ वर्षांवरील मुलांसाठी लवकरच येणार नवी लस

१२ वर्षांवरील मुलांसाठी लवकरच येणार नवी लस

भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू आहे. जास्तीतजास्त नागरिकांना लासवंत करून देशाला कोरोनामुक्त करण्याचा सरकारचा मानस आहे. महिन्याभरापूर्वी १५ वर्षांवरील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते. त्यानंतर आता १२ वर्षांवरील मुलांसाठी देखील लवकरच लस उपलब्ध होणार आहे.

बायोलॉजिकल-ई कंपनीच्या कॉर्बव्हॅक्स (Corbevax) लसीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध नियामक प्रशासनाची (DCGI) तज्ज्ञ समितीने शिफारस केली आहे. लवकरच या लसीला मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाल्यास १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लस उपलब्ध होणार आहे.

कॉर्बव्हॅक्स ही भारतात विकसित झालेली तिसरी लस आहे. कोरोनाविरोधात भारतात तयार झालेली ही आरबीडी प्रोटीन सब-युनिटवर आधारीत लस आहे. हैद्राबादच्या बायोलॉजिकल-ई या कंपनीने कॉर्बव्हॅक्स लसीची निर्मिती केली असून, ही लस कोविडविरुद्धच्या लढाईत ९० टक्के प्रभावी असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान बायोलॉजिकल-ई ने अलीकडेच लसीच्या ५ ते १२ वर्षे आणि १२ ते १८ वर्षे वयोगटासाठीच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

हे ही वाचा:

पुलवामा हल्ला आणि बदललेला भारत!

‘काँग्रेसचे आंदोलन म्हणजे नाना पटोलेंची नौटंकी’

नाना पटोलेंचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले

काँग्रेसचे आंदोलन; भाजपा कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

कॉर्बव्हॅक्स ही लस आतापर्यंत भारतात मान्यता मिळालेल्या सर्व लसींपेक्षा सर्वात स्वस्त अशी लस असणार आहे. इतर लसींप्रमाणेच या लसीचेही दोन डोस घेणे आवश्यक आहे. ही लस बाजारात २५० रुपयांपर्यंत उपलब्ध करुन दिली जाईल असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Exit mobile version