लष्कराच्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त भारतीय सैनिकांनी प्रथमच भारतीय लष्कर दिनाच्या निम्मिताने त्यांच्या नवीन लढाऊ गणवेशाचे सार्वजनिकरित्या अनावरण केले. लष्कर दिनानिमित्त पॅराशूट रेजिमेंटच्या कमांडोनी नवीन गणवेशात दिल्ली कॅंटमधील परेड ग्राउंडवर कूच केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
हा नवा गणवेश यावर्षी ऑगस्टपर्यंत भारतीय लष्करात दाखल होण्याची शक्यता आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने १५ नमुने, आठ डिझाईन्स आणि चार फॅब्रिक पर्यायांद्वारे सैन्याचा नवीन लढाऊ नमुना गणवेशाचा तयार करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या गणवेशामुळे सैनिकांना अधिक आराम मिळेल तसेच डिझाइनमध्ये एकसमानता येईल. लष्कराच्या कामाच्या गरजा आणि लढाऊ पोशाखात एकसमानपणाची गरज लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. नवीन गणवेशात बेल्ट आत आणि शर्ट बाहेर असेल.
अमेरिकेसह अनेक देशांचे सैन्य डिजिटल पॅटर्नच्या गणवेशाचा वापर करते. सध्याच्या गणवेशात शर्ट पँटच्या आत आणि बेल्ट बाहेरून घातला जातो. नवीन गणवेशात बेल्ट आत आणि शर्ट बाहेर असेल. लष्कराच्या अधिकाऱ्याच्या मते, यामुळे काम करणे सोपे होईल. कपड्यांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
‘वडेट्टीवारांनी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’ अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली आहे’
किरण मानेचे मालिका निर्मात्यांवर नवे आरोप!
लेखक, संपादक आणि प्रकाशक अरुण जाखडे यांचे निधन
दहशतवाद्याला सोडवण्यासाठी अमेरिकेत ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर हल्ला
१५०हून अधिक कर्मचार्यांना लढाऊ गणवेशाचे १५ संच देण्यात आले आहेत. शॉर्टलिस्ट केलेले नमुने, डिझाइन आणि फॅब्रिक्सचे वेगवेगळे कॉम्बिनेशन होते. त्यांच्या अभिप्रायाच्या आधारे गणवेशाचा अंतिम नमुना निवडण्यात आला आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने इतर विविध देशांच्या सैन्याच्या लढाऊ गणवेशाचे विश्लेषण करून नवीन गणवेशाची रचना करण्यात आली आहे.