26 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरविशेषकोविड चाचण्यांचे नवे नियम जारी, वाचा सविस्तर...

कोविड चाचण्यांचे नवे नियम जारी, वाचा सविस्तर…

Google News Follow

Related

देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश हैराण झाला आहे. देशात दररोज ३ लाखापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हजारो रुग्णांचा दररोज मृत्यू होतोय. या संकट काळात आरोग्य यंत्रणा दिवसरात्र काम करत आहे. लाखो लोकांच्या दररोज आरटीपीसीआर टेस्ट केल्या जात आहेत. याशिवाय कोरोना विरोधाच्या लढाईत सक्षम व्हावं यासाठी लसीकरण मोहिम जोरात सुरु आहे. या दरम्यान इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरने टेस्टिंग संदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

कोरोना काळात टेस्ट करणाऱ्या प्रयोगळशाळांवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे हा ताण कमी करावा यासाठी आरसीएमआरने कोविड टेस्ट संदर्भात महत्त्वपूर्ण सूचान जारी केल्या आहेत. “आंतरराज्यीय प्रवास करताना आता प्रवाशांना आता आरटीपीसीआर टेस्ट करण्याची आवश्यकता नाही. यातून प्रयोगशाळांवरील भार उलट कमी होईल. त्यातूनच कोरोना संक्रमणाला रोखता येईल”, असं आरसीएमआरने म्हटलं आहे.

हे ही वाचा:

कोरोनाने अनाथ केलेल्या मुलांसाठी धावून आल्या स्मृती इराणी

टाटा उभारणार ४०० ऑक्सिजन प्लांट्स

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात ठाकरे सरकार उताणे

मुंबईतील लसीकरणाला सुरूवात

“देशात पुन्हा कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. देशाचा पॉझिटिव्ह रेट हा २० टक्के झाला आहे. या संकट विरोधात लढताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले गेले पाहिजेत. तसेच मास्कचा वापर केला पाहिजे”, असं देखील आरसीएमआरने म्हटलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा