कोळ्याच्या नव्या प्रजातीला हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे नाव

कोळ्याच्या नव्या प्रजातीला हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे नाव

मुंबईवर झालेल्या २६/११च्या प्राणघातक हल्ल्यातील एक दहशतवादी अजमल कसाब याला पकडण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या सहाय्यक निरीक्षक तुकाराम ओंबळे यांना अनोखी मानवंदना वाहण्यात आली आहे. मुंबईतील एका नव्या कोळ्याच्या प्रजातीचे नाव त्यांच्या सन्मानार्थ ‘इसियस तुकारामी’ असे ठेवण्यात आले आहे.

पर्यावरणप्रेमी आणि निसर्ग छायाचित्रकार ध्रुव प्रजापती यांनी मुंबईत कोळ्यांच्या दोन प्रजाती शोधून काढल्या. त्यापैकी एका प्रजातीला ओंबळेंचे नाव देण्यात आले तर दुसऱ्या प्रजातीला त्यांचे मित्र कमलेश चोळके यांचे नाव देण्यात आले आहे. दुसऱ्या प्रजातीचे शास्त्रीय नाव ‘फिंटेला चोळकेई’ असे देण्यात आले आहे. या प्रजाती ठाणे आणि मुंबईतील आरे दुग्ध कॉलनी या दरम्यान आढळून आल्या आहेत. कोळ्यांच्या दोन्ही प्रजाती या उडणाऱ्या अथवा उडी मारणाऱ्या प्रजातींपैकी एक आहेत.

हे ही वाचा:

बंगलोसेनेतील अजून एका नेत्याचा अनधिकृत बंगला?

पोलिसांच्या वाट्यालाही ठाकरे सरकारकडून उपेक्षा!

पुण्यात घरांच्या तोडकामावरून सुप्रिया सुळे-अजित पवार आमनेसामने

ट्विटरच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याचाच राजीनामा

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या तुकाराम ओंबळे यांनी आपल्या शरिरावर दहशतवाद्यांपैकी एक अजमल कसाब याच्या गोळ्यांचा बेछुट मारा झेलला होता आणि त्याला जिवंत पकडले होते. त्यानंतर त्यांना शांतीकाळात दिला जाणार सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र बहाल करण्यात आले होते.

तुकाराम ओंबळे हे मूळचे साताऱ्याचे होते. भारतीय सैन्य दलातून नाईक पदावरून निवृत्त झाल्यानंतर १९९१ मध्ये तुकाराम ओंबळे हे मुंबई पोलिस दलात आले होते. २६ तारखेच्या रात्री अबू इस्माईल आणि अजमल कसाब हे एका स्कॉडा गाडीतून तुकाराम ओंबाळे कर्तव्य बजावत असलेल्या नरिमन मार्गावर आले. त्यावेळी इस्माईल तर पोलिसांकडून मारला गेला, मात्र तुकाराम ओंबळेंच्या साहसामुळे अजमल कसाब पोलिसांच्या हाती जिवंत सापडला होता.

Exit mobile version