हिंदी महासागरात नवा देवमासा

अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा दावा देवमासा हा जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. हा मासा वितुप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हिंदी महासागरात देवमाशांची नवी प्रजाती सापडणे ही पर्यावरणप्रेमींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे.

हिंदी महासागरात नवा देवमासा

शास्त्रज्ञांना हिंदी महासागरात देवमाशाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. हिंदी महासागरात देवमाशाच्या आवजांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला. या संशोधनामुळे विलुप्त होत चाललेल्या या प्रजातीच्या निवासस्थानाबद्दलच्या नव्या माहितीवर प्रकाश पडेल.

देवमासा हा जगातील सर्वात मोठ्या आकारमानाचा सजीव आहे. देवमासे पाण्यात राहणाऱ्या मोजक्या सस्तन माश्यांपैकी एक आहेत. यापूर्वी बेसुमार शिकार झाल्यामुळे ही प्रजाती विलुप्त होत असलेल्या प्रजातींपैकी एक आहे.

देवमासे पाण्यात राहताना खर्जात विशिष्ट तऱ्हेने आवाज करतात. या आवाजावरून त्यांची ओळख केली जाऊ शकते. अमेरिकेतील न्यु इंग्लंड एक्वेरियम येथील संशोधकांनी ओमानच्या किनाऱ्यापासून ते मादागास्कर पर्यंतच्या भागात वेगळ्याच तऱ्हेच्या आवाजाची नोंद केली. या प्रकारच्या आवाजाची नोंद यापूर्वी झाली नसल्याने ही देवमाशांची नवी प्रजाती असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

या संशोधनाचे सह-लेखक सॅल्व्हाटोर केर्शिओ यांनी सांगितले, की नव्या तऱ्हेच्या देवमाशाचे गीत तुमच्या डेटा मध्ये येणे हे फार उत्साहवर्धक आहे. 

ओमान येथील रेकॉर्डिंगपूर्वी अरबी समुद्रातील देवमाशांच्या गाण्याविषयी कोणतीच माहिती नव्हती. त्यामुळे अरबी समुद्रातील देवमाशांचे अस्तित्व हा केवळ एक अंदाज होता.

Exit mobile version