28 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषआजपासून झी वाहिनीवर घुमणार सप्तसूर

आजपासून झी वाहिनीवर घुमणार सप्तसूर

Google News Follow

Related

भरतीय मनोरंजन विश्वातील ‘सा रे ग म प’ हा लोकप्रिय रियालिटी शो परत आला आहे. आज पासून म्हणजेच शनिवार १६ ऑगस्ट पासून या कार्यक्रमाचा नवा हंगाम सुरू होत आहे. झी टीव्ही या हिंदी मनोरंजन वाहिनीवर हा कार्यक्रम प्रेक्षकांना बघता येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा हा ३० वा हंगाम आहे.

भारतीय चित्रपट सृष्टीतील आघाडीचे संगीतकार आणि गायक शंकर महादेवन, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया हे या या स्पर्धेचे परीक्षक असणार आहेत. तर आदित्य नारायण हा या स्पर्धेच्या सूत्रसंचालकच्या भूमिकेत दिसेल. त्यामुळे ‘सा रे ग म प’ चा हा हंगाम गाजणार यात शंकाच नाही. स्पर्धेच्या या हंगामातून नवीन कोणती संगीत रत्ने उदयास येतात याकडे देशभरातील प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाच्या प्रोमो मधून काही स्पर्धकांची झलक आयोजकांतर्फे दाखवण्यात आली असून ती प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडताना दिसत आहे.

हे ही वाचा:

बालकल्याण मंत्री म्हणतात, महिलांनो झोपायच्या आधी थोडी दारू प्या!

राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

‘उद्धवजींमध्ये राहुलजी स्पष्ट दिसतात’

धोनीच्या ३००व्या सामन्यात चेन्नई संघाने लुटले विजेतेपदाचे सोने

१९९५ साली ‘सा रे ग म प’ हा रियालिटी शो सुरु झाला असून भारतीय मनोरंजन क्षेत्रातील तो पहिला गायन स्पर्धा असणारा रियालिटी शो ठरला आहे. आजवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रेया घोषाल, कुणाल गांजावाला असे अनेक ताकदीचे कलाकार पुढे आले आहेत. स्पर्धेच्या या ३० व्या हंगामाला तब्बल १२ मोठ्या ब्रॅण्ड्सचे प्रायोजकत्व लाभले आहे. हा एक वेगळ्या प्रकारचा विक्रम या कार्यक्रमाने केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा