मुंबई महापालिकेची गत जाऊ तिथे खाऊ अशी झालेली आहे. आता महत्त्वाची बाब म्हणजे पालिकेमध्ये आता नवा भंगार घोटाळा उघडकीस आलेला आहे. जुन्या मोठ्या लोखंडी जलवाहिन्यांचे तुकडे भंगारात देण्यात घोटाळा झालेला आहे.
हे भंगारात देताना कंत्राटदारावरच पालिकेचा वरदहस्त असल्याचे दिसून आलेले आहे. यातील मुख्य बाब म्हणजे कुठल्याही पद्धतीची निविदा प्रक्रीया याकरता राबविण्यात आलेली नव्हती. एक लाख किलोंचे हे भंगार आधीच्याच कंत्राटदाराला देण्यात आले ही बाब आता निदर्शनास आली आहे. सदर प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर झाला असून या प्रकरणी अन्य कंत्राटदाराने पालिका आयुक्तांकडेच आता याविषयी दाद मागितली आहे. एकूणच आता या प्रकारामध्ये गडबड असल्याने भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी आरोप केलेला आहे.
पालिकेने २०२० मध्ये भंगार साहित्याची विल्हेवाट लावण्याकरिता जो अंदाजित दर काढला होता तो १८.१४ रुपये प्रति किलो इतका होता. तर कंत्राटदाराने ३२.२१ प्रति किलो या दराने भंगाराची खरेदी करण्याची तयारी दर्शवल्यामुळे त्याला मूळ कंत्राट दिले होते असे प्रशासनाचे म्हणणे आहे. तब्बल १ लाख १८ हजार किलो वजनाच्या भंगारमधून पालिकेला ३२ कोटी २६ लाख ७९ हजारांची रक्कम मिळणार आहे. यामध्ये पालिकेचे नुकसाना झाल्याचा दावा दुसरा कंत्राटदार याने केलेला आहे. त्यामुळेच या एकूणच भंगारविक्री प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत आहे ही शंका आता खरी ठरू लागली आहे.
हे ही वाचा:
मॉल बाहेरूनच बघणाऱ्यांची संख्या वाढली
सदैव अटल: श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचे पुण्यस्मरण
खिळखिळ्या इमारतींबरोबर सेवाशुल्कामुळे म्हाडाचे रहिवाशीही जर्जर
प्रवीण गायकवाडना लायकीत राहण्याचा इशारा! या पक्षाने दिला दम
घडलेल्या एकूणच वृत्तावर ‘लोकसत्ता’ वर्तमानपत्राशी बोलताना, अनिल जांभोरे उपप्रमुख अभियंता म्हणाले, दोन वर्षांसाठी भंगाराचा दर आधीच ठरलेला आहे. तसेच या अनुषंगानेच कंत्राट देण्यात आलेले आहे. त्यामुळे पुनर्निविदा काढण्याची आवश्यकता नाही.