गेली दीड वर्षे आपण कोरोना या महामारीसोबत लढतोय. त्यामुळेच आता आपणही कोरोनासोबत जगायला शिकलोय. कोरोनामहामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीही करण्यात आली. सर्वात जास्त टाळेबंदी ही महाराष्ट्रात झालेली आहे. तरीही महाराष्ट्राची कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येताना दिसत नाही. आरोग्ययंत्रणा कुचकामी ठरलेल्या आहेत हेच यावरून स्पष्ट होत आहे. असे असले तरी, सरकार निर्बंध लावून सामान्य नागरिकाच्या सहनशीलतेचा आता अंत पाहात आहे.
आजपासून पुन्हा एकदा निर्बंधांची मालिका सुरु झालेली आहे. ठाकरे सरकारने पुन्हा एकदा सर्वांना निर्बंधांच्या जाचात बांधलेले आहे. आजपासून दुकाने सायंकाळी ४ पर्यंत खुली राहणार असून, सायंकाळी ५ नंतर बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
जूनमध्ये पहिल्या आठवड्यांमध्ये खुले झालेले निर्बंध पुन्हा एकदा लादण्यात आल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे खूपच हाल होत आहेत. सर्वसामान्य माणूस या निर्बंधांमुळे होरपळला जात आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यापासून निर्बंध शिथिल करण्यात आले होते. पण रस्त्यांवर होणारी गर्दी, लोकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन, रुग्णसंख्येत होत असलेली वाढ, नव्या विषाणूच्या संसर्गाची चर्चा यामुळे पुन्हा एकदा निर्बंध कठोर करावे लागले आहेत.
हे ही वाचा:
कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ७६ दिवसांनी हजाराच्या आत
नव्या निर्बंधांविरुद्ध व्यापारी ‘या’ शहरांमध्ये आक्रमक
नेदरलँड्सचे युरो कपमधून ‘चेक’ आऊट
नव्या निर्बंधांमुळे सध्याच्या पाच स्तराऐवजी राज्याची विभागणी तीन ते पाच स्तरात करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या स्तरातील जिल्हेही तिसऱ्या स्तरात ठेवले गेले आहेत. त्यानुसार उपाहारगृहे सायंकाळी ४ पर्यंत खुली राहतील. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर हे निर्बंध शिथिल करता येणार नाहीत.
विवाहसमारंभ, उपाहारगृहे यात होणारी गर्दी टाळण्यासाठी भरारी पथके नेमून तपासणी करण्यात येणार आहे.
उपनगरीय रेल्वे सेवेत सध्या परवानगी असलेल्या अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवास करता येणार आहे. शिक्षकांना रेल्वेने प्रवास करता येईल, अशी शक्यता होती पण शिक्षण मंत्र्यांची घोषणा हवतेच विरली आहे.