दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमिक्रोन व्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातला असताना गेल्या काही दिवासांपासून राज्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्यात झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत.
हे सर्व निर्बंध शुक्रवार ३१ डिसेंबर पासून लागू होणार आहेत. या नियमांसोबतच स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.
प्रशासनाकडून लावण्यात आलेली नवीन नियमावली –
- खुल्या मैदानातील किंवा बंद हॉलमधील लग्न सोहळ्याला केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम किंवा सभेमध्ये केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- अंत्यसंस्कार विधीसाठी केवळ २० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- पर्यटनस्थळावर आणि गर्दी जमू शकते अशा जागांवर जमावबंदी लागू कऱण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे. तर यापूर्वी प्रवासावर लावलेले निर्बंध तसेच लागू राहणार आहेत.
हे ही वाचा:
‘आम्ही २० करोड मुसलमान…’ नसिरुद्दीन शहांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड
‘मुघल हे तर राष्ट्र निर्माते!’ नासिरुद्दीन शहांचा जावई शोध
‘राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार स्थापण्याची मोदींची इच्छा होती!’ पवारांची नवीन पुडी
नारायण राणेंना सिंधुदुर्ग पोलिसांनी बजावलेली नोटीसच बेकायदेशीर
सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोनाने आणि वाढत्या ओमिक्रोन बाधितांनी नागरिकांची चिंता वाढवली आहे. मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आता सरकार पुन्हा एकदा अलर्ट मोड वर आले आहे.