देशात आणि विशेषतः राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या तरी लॉकडाऊन लागू होणार नसून निर्बंध मात्र कठोर केले जाणार असल्याचे सरकारमधील मंत्र्यांकडून सांगण्यात येत होते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शनिवारी ८ जानेवारी रोजी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. ही नियमावली १० जानेवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहे.
काय आहे नवी नियमावली
- सकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी
- आपत्कालीन परिस्थिती वगळता रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी
- सरकारी कार्यालयातील बैठका ऑनलाईन
- खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती
- कार्यालयांमध्ये पूर्ण लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांनाच परवानगी
- लग्नाला फक्त ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी
- अंत्यसंस्काराला फक्त २० जणांना परवानगी
- धार्मिक, सांकृतिक, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांना फक्त ५० जणांना परवानगी
- शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद
- स्विमिंगपूल, ब्युटी पार्लर, स्पा, जिम बंद
- सलूनमध्ये सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के उपस्थितीला परवानगी
- वस्तुसंग्राहालये, प्राणी संग्राहालये, पार्क, किल्ले बंद
- मॉल, मार्केटमध्ये केवळ लसीकरण पूर्ण झालेल्यांना परवानगी
- उपहारगृहे, हॉटेल्सला सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत परवानगी; केवळ लसीकरण पूर्ण झालेल्यांना परवानगी
- नाट्यगृह, सिनेमागृहामध्ये लसीकरण पूर्ण झालेल्यांना ५० टक्के उपस्थितीला परवानगी
- सार्वजनिक वाहतुकीला पूर्ण लसीकरण झालेल्यांना परवानगी
हे ही वाचा:
… म्हणून पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा रद्द
‘या’ दिवशी होणार ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
नेत्यांनी अनोख्या पद्धतीने सोडवला वाद…
राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट सुरु आहे. शनिवारी ८ जानेवारी रोजी नव्या ४१ हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, ४१ हजार ४३४ नव्या रुग्णांपैकी २० हजारांहून अधिक रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. ओमायक्रोनचे १३३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.