दिल्लीतील प्रदूषण; पेंढा जाळणाऱ्याला दुप्पट दंड

शेतकऱ्यांना ३० हजार रुपये दंड भरावा लागणार

दिल्लीतील प्रदूषण; पेंढा जाळणाऱ्याला दुप्पट दंड

देशाचे राजधानीचे शहर असलेल्या दिल्लीला सध्या प्रदूषणाचा विळखा बसला असून तेथील हवेची गुणवत्ता खालावली आहे. यानंतर दिल्लीमधील आणि आसपासच्या परिसरातील वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने आता गवताचा पेंढा जाळणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पेंढा जाळणाऱ्यांवर कारवाई म्हणून वसूल करण्यात येत असलेली रक्कम कमी असल्याचे म्हणत सरकार टीका केली होती. यानंतर आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलत ही रक्कम दुप्पट केली आहे. माहितीनुसार, आता दोन एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. तर दोन ते पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी पेंढा जाळल्यास त्यांना १० हजार रुपये भरावे लागणार आहेत. यापेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ३० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या नोव्हेंबर महिन्यात पेंढा जाळण्यावर कठोरता दाखवली होती. प्रदूषण रोखण्यासाठी सरकार काय पावले उचलत आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली होती.

हे ही वाचा:

लोकसभेच्या पराभवानंतर भाजपाने केले मायक्रो मॅनेजमेन्ट!

‘राहुल गांधी लाल पुस्तकाला संविधान म्हणून संबोधतात पण त्यातील पाने मात्र कोरी’

पवारांची यादी अकबरला मिळाली, अमरच्या यादीचे काय?

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

या अधिसूचनेत प्रदूषण नियंत्रण मंडळे आणि हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग यांच्यामार्फत पर्यावरणविषयक तक्रारी हाताळण्याच्या प्रक्रियेची रूपरेषा देखील देण्यात आली आहे. चौकशी करण्यासाठी आणि प्रदूषणाच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी नवीन नियम दुरुस्तीमध्ये समाविष्ट केले आहेत. वाढत्या चिंतेला प्रतिसाद म्हणून, दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिल्लीच्या खराब होणाऱ्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, बुधवारपासून शहरात कचरा जाळण्याविरोधी मोहिमेची घोषणा केली.

Exit mobile version