दहशतवादाचा नवा पॅटर्न ‘रेल जिहाद’

भाजप नेते कपिल मिश्रा यांचे वक्तव्य

दहशतवादाचा नवा पॅटर्न ‘रेल जिहाद’

‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’नंतर आता ‘रेल जिहाद’ची चर्चा होत आहे. देशात वाढत्या रेल्वे कटाच्या घटनांना दिल्ली भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ‘रेल जिहाद’ असे नाव दिले आहे. मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी हे केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

वृत्तसंस्था आयएनएसशी (INS) बोलताना कपिल मिश्रा यांनी स्पष्टपणे सांगितले की, देशात होत असलेले रेल्वे अपघात हे अपघात नसून षड्यंत्र आहेत. वंदे भारत सुरू असताना दगडफेक करा, रेल्वे रुळांवर सिलिंडर ठेवा आणि अशा लोकांनाही पकडले जात आहे. याला आपण ‘रेल जिहाद’ म्हणू शकतो.

हे ही वाचा : 

उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचे ११ दिवसांचे प्रायश्चित्य !

इराणच्या कोळसा खाणीत स्फोट, ५१ जणांचा मृत्यू, २० जण जखमी!

काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्सवर अमित शहांचा प्रहार

हुजूरपागा मुलींच्या शाळेत “ईद ए मिलाद”ची आवश्यकता काय?

ते पुढे म्हणाले, देशात समाजाचा असा एक वर्ग आहे, ज्याला भारताचा विकास आवडत नाहीये. जो मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहे. असे व्हिडीओ देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये एका विशिष्ट समाजातील लहान मुले रेल्वे रुळ तोडत आहेत, त्याचे स्क्रू काढत आहेत, त्यात काही वस्तू ठेवत आहेत. हा दहशतवादाचा नवा प्रकार आहे.

अशा लोकांशी दहशतवादी आणि जिहादींसारखे वागले पाहिजे. हा गुन्हेगारी कट आहे. मालगाड्या आणि रेल्वे ट्रॅक जाणीवपूर्वक विस्कळीत केले जात आहेत. त्यामुळे काही मोठी घटना घडण्याची शक्यता आहे. देवाच्या कृपेने कोणतीही मोठी दुर्घटना घडत नसून असे षड्यंत्र हे देशाच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, मोठ्या प्रमाणात लोकांचा जीव घेण्याच्या कटाचा भाग आहेत. रेल्वे जिहादविरोधात कठोर पावले उचलण्याची गरज आहे, असे भाजप नेते कपिल मिश्रा यांनी म्हटले.

Exit mobile version